Ratnagiri News – विद्यार्थ्यांनी वाजत-गाजत केली पहिल्या दिवसाची सुरुवात, पण स्वागताला अधिकाऱ्यांनीच मारली दांडी

Ratnagiri News – विद्यार्थ्यांनी वाजत-गाजत केली पहिल्या दिवसाची सुरुवात, पण स्वागताला अधिकाऱ्यांनीच मारली दांडी

यंदाच्या शैक्षणिक वर्षाला 16 जून पासून प्रारंभ झाला. शाळेच्या पहिल्या दिवशी वाजत-गाजत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित रहाण्याचे आदेश शासनाने दिले होते. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील 10 अधिकारी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेत उपस्थित नव्हते.

जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये 16 जून रोजी विद्यार्थ्यांचे वाजत-गाजत ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले होते. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करून संवाद साधणे शासनाला अपेक्षित होते. प्रत्येक अधिकाऱ्याला एक शाळा नेमून देण्यात आली होती. जिल्ह्यातील 410 अधिकाऱ्यांनी शाळेला भेटी दिल्या. त्यामध्ये वर्ग 1 आणि 2 चे 118 अधिकारी, 44 विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख 173, इतर 75 अधिकारी आणि तीन लोकप्रतिनिधींनी शाळांना भेटी दिल्या.

या अधिकाऱ्यांनी मारली दांडी

एकूण 10 अधिकाऱ्यांनी स्वागताच्या दिवशी शाळेला भेट दिली नाही. त्यामध्ये राहूल गायकवाड – उपजिल्हा निवडणूक अधिकारी (जि.प.शाळा कुवांरबाव क्र.1), हर्षलता गेडाम – उपजिल्हाधिकारी (जि.प.शाळा रवींद्रनाथ कुवांरबाव), निशाताई कांबळे – उपजिल्हाधिकारी भूसंपादन (नगरपरिषद शाळा क्र.1 गाडीतळ), अर्चना बोंबे – तहसीलदार (जि.प.शाळा कर्दे), अमोल दाभोळकर – उपअभियंता जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा (जि.प.शाळा क्र.1 करतुडे) डॉ. महेश्वरी सातव – तालुका आरोग्य अधिकारी (जि.प.शाळा खालगाव क्र.3), आदिती अभिजीत कसालकर – पशुधन विकास अधिकारी (जि.प.शाळा पानवल), उमा घारगे पाटील – गटविकास अधिकारी (जि.प.शाळा ओझरवाडी), ज्योती यादव – तालुका आरोग्य अधिकारी (कापसाळ पायर) यांनी 16 जून रोजी शाळेत भेट दिली नाही. दोन अधिकाऱ्यांनी भेट न देण्याची कारणे दिली आहेत त्यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव यांनी आरोग्य तपासणी असल्याने भेट देता आली नाही, असे सांगितले आहे. तसेच तालुका आरोग्य अधिकारी ज्योती यादव यांनी कापसाळ-पायरवाडी पुलावर पाणी आल्याने शाळेला भेट देता आली नसल्याचे सांगितले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;