प्रेमात बाप झाला वेडा! स्वत:च्या अल्पवयीन मुलाला अडकवलं लग्नाच्या बेडीत, पितळ उघडं पडताच झाला पसार

प्रेमात बाप झाला वेडा! स्वत:च्या अल्पवयीन मुलाला अडकवलं लग्नाच्या बेडीत, पितळ उघडं पडताच झाला पसार

सासू होणाऱ्या जावयासोबत पळून गेल्याची घटना तुमच्या लक्षात असेलच. गेल्या काही महिन्यांमध्ये अशा काही विचित्र घटना घडल्या आहेत. त्यामुळे लोकांचा प्रेम आणि लग्न यावरचा विश्वास उडत चालला आहे. असाच प्रकार आता उत्तर प्रदेशात घडला आहे. मुलीच्या प्रेमात आंधळा झालेल्या एक व्यक्तीने कोणाला कळू नये म्हणून त्या मुलीसोबत स्वत:च्या अल्पवयीन मुलाच लग्न ठरवलं होतं. मात्र पितळ उघड पडताच तो प्रेयसीला घेऊन फरार झाला आहे.

उत्तर प्रदेशातील रामपूरच्या भन्साळी गावातील शकील याचे एक 18 वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांना याची भनक लागू नये म्हणून त्याने स्वत:च्याच 15 वर्षांच्या मुलाच प्रेयसीसोबत लग्न ठरवलं. मुलासह कुटुंबीयांनी विरोध केला, परंतु तो ऐकला नाही. त्याने पत्नीसह मुलालाही मारहाण केली. कुटुंबीयांच्या विरोधाला ठेंगा दाखवत त्याने जबरदस्ती मुलाच लग्न प्रेयसीसोबत ठरवलं. लग्न ठरवल्यानंतर तो तिच्यासोबत तासन्तास बोलू लागला. त्यामुळे मुलाला आणि त्याच्या आईला संशय आला. त्यानंतर मुलाने बापाच्या प्रेमाचा छडा लावला आणि सगळ्यांनाच धक्का बसला. विशेष म्हणजे याची कल्पना शकीलच्या आई-वडिलांना होती. या काळात मुलाने आणि त्याच्या आईने शकीलविरोधात सर्व पुरावे जमा केले. परंतु पितळ उघडं पडताच शकील प्रेयसीला घेऊन फरार झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;