Pune News – नदीपात्रात उतरून सेल्फी काढणाऱ्या तरुणांना घडवली अद्दल, उठाबशा काढायला लावत पोलिसांनी शिकवला धडा

Pune News – नदीपात्रात उतरून सेल्फी काढणाऱ्या तरुणांना घडवली अद्दल, उठाबशा काढायला लावत पोलिसांनी शिकवला धडा

राज्यात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नद्या, धरणे ओव्हरफ्लो झाले आहेत. यामुळे प्रशासनाने नागरिकांना धरण, नदी परिसरात न जाण्याचे आवाहन केले आहे. असे असतानाही हुल्लडबाज तरुणाई धरण परिसरात, धबधब्याखाली जीवाची पर्वा न करता थिल्लरपणा करताना दिसते. अशा तरुणाईला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. नदीपात्रात अंघोळ करत सेल्फी काढणाऱ्या तरुणांना पोलिसांनी उठाबशा काढायला लावल्या.

प्रशासनाने नदीपात्रात न उतरण्याचे निर्देश देऊनही पुण्यातील काही तरुण अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले होते. अंघोळ करत सर्वजण सेल्फी काढत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना तात्काळ सदर ठिकाणी दाखल होत तरुणांना उठाबशा काढायला लावत चांगलाच धडा शिकवला. तसेच पुन्हा नदी पात्रात उतरल्यास कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला. तरुणांचा उठाबशा काढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;