Sindhudurg News – दोन वॅगनार कार अन् नंबर प्लेट एकच, चौकशीअंती गौडबंगाल उलगडणार

Sindhudurg News – दोन वॅगनार कार अन् नंबर प्लेट एकच, चौकशीअंती गौडबंगाल उलगडणार

कणकवली शहरामध्ये गुरुवारी रात्री एकाच नंबरच्या दोन वॅनगार कार आढळून आल्या. याबाबत जागरूक नागरिकांनी दिलेल्या माहितीनंतर कणकवली पोलिसांनी सकाळच्या सुमारास दोन्ही वॅनगार कार ताब्यात घेतल्या. या दोन्ही कारचा नंबर (एम एच 07 एजी8533) सेम आहे. सदर कार सत्यवान भगवान माळवे आणि विनोद विठ्ठल खंडागळे यांच्या ताब्यात होत्या, अशी माहिती कणकवली पोलिसांनी दिली. सत्यवान माळवे महसूल कर्मचारी असून विनोद खंडागळे प्राथमिक शिक्षक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहरातील विद्यानगर भागात एकाच नंबर प्लेटच्या दोन वॅगनार कार असल्याची निनावी तक्रार कणकवली पोलीस ठाण्यात आली. पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. यानंतर एकाच नंबरच्या दोन्ही वॅगनार कार पोलिसांनी जप्त केल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही कारमालक एकाच इमारतीत राहतात. याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना कळविण्यात आले असून त्यांच्याकडून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पीएसआय हाडळ यांनी सांगितले. दरम्यान, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ओरोस येथील मोटरवाहन निरीक्षक अतुल चव्हाण कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू केली. याबाबत आरटीओ विभाग चौकशी करणार असून त्यानंतर एकाच नंबरचे गौडबंगाल उलगडणार आहे. चौकशीअंती खोटा नंबर वापरणाऱ्या कारमालाकावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे कणकवली पोलिसांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’’ उद्योजक भरत गीते यांना ‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण’’ पुरस्कार! ‘‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’’ उद्योजक भरत गीते यांना ‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण’’ पुरस्कार!
‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार’’ हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण उद्योगविश्वासाठी प्रेरणादायी टप्पा आहे.
मोठ्या प्रकल्पांपेक्षा मूलभूत सुविधा सोडविण्यावर भर द्या : खासदार श्रीरंग बारणे 
नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारण्यावर भर : महापौर रवि लांडगे
पिंपरी-चिंचवडमध्ये उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे १००० वृक्षांचे वाटप
Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स