अल्प उत्पन्न गटासाठीच्या मुंबईतील 368 भूखंडांवर 30 वर्षे बांधकामच नाही, हायकोर्टाने घेतली गंभीर दखल

अल्प उत्पन्न गटासाठीच्या मुंबईतील 368 भूखंडांवर 30 वर्षे बांधकामच नाही, हायकोर्टाने घेतली गंभीर दखल

अल्प उत्पन्न गटाच्या (एलआयजी) घरांसाठी 30 वर्षांपूर्वी देण्यात आलेल्या मुंबईतील 368 भूखंडांवर अद्याप बांधकामच झाले नसल्याची धक्कादायक माहिती उच्च न्यायालयात सादर झाली. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने म्हाडाचे अध्यक्ष व गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव यांना याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

अर्जुन सावंत यांनी ही याचिका केली आहे. 1996 मध्ये म्हाडाने तब्बल 368 भूखंड एलआयजीच्या घरांसाठी दिले. अद्याप या भूखंडांचा विकासच करण्यात आलेला नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. मुंबईतील या भूखंडांचा 30 वर्षे झाली विकासच झाला नाही याची कल्पना केली जाऊ शकत नाही. याचिकेतील आरोप गंभीर आहेत. त्यामुळे म्हाडाचे अध्यक्ष व गृहनिर्माण प्रधान सचिवांनी याचे प्रतिज्ञापत्र सादर करायला हवे, असे आदेश देत न्यायालयाने ही सुनावणी 1 जुलै 2025 पर्यंत तहपूब केली.

म्हाडाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

म्हाडाने या भूखंडांचे वाटप खरेच केले आहे का, यामध्ये कशा प्रकारे कार्यवाही झाली हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे याचा खुलासा म्हाडाने करणे आवश्यक आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

याचिकाकर्त्याचा आरोप

यातील काही भूखंडांचे बेकायदेशीर व्यवहार विकासक करत आहेत. अवैधपणे या भूखंडांचे हस्तांतरण सुरू आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. हे आरोप गंभीर असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. गोराई येथील एका भूखंडाचा मुद्दाही याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. या याचिकेत ईडी व लाचलुचपत विभागालाही प्रतिवादी करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;