अमली पदार्थांची खुलेआम विक्री, वैद्यकीय-अभियांत्रिकीचे शेकडो विद्यार्थी व्यसनाच्या मगरमिठीत; रविंद्र चव्हाण यांचा आरोप

अमली पदार्थांची खुलेआम विक्री, वैद्यकीय-अभियांत्रिकीचे शेकडो विद्यार्थी व्यसनाच्या मगरमिठीत; रविंद्र चव्हाण यांचा आरोप

मुंबई-पुण्यासह राज्याच्या विविध शहरांमध्ये खेड्यांमधून विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी येत असतात. परंतु यातले बरेच विद्यार्थी हे व्यसनाच्या आहारी गेल्याची अनेक प्रकरण उजेडात आली आहे. अमली पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच भवितव्य धोक्यात आलं आहे. याच मुद्याला अनुसरून काँग्रेस खासदार रविंद्र चव्हाण यांनी नांदेडमधील वैद्यकीय-अभियांत्रिकी या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या अभ्यासासाठी नांदेडमध्ये येणारे शेकडो विद्यार्थी व्यसनाधीन होत असल्याचे म्हटल आहे.

नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनामध्ये समितीची बैठक पार पाडली. या बैठकीमध्ये खासदार रविंद्र चव्हाण यांनी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. ते म्हणाले की, “खासगी शिकवणीवर्ग आणि वैद्यकीय-अभियांत्रिकी या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांच्या अभ्यासासाठी नांदेडमध्ये शिकणारे शेकडो विद्यार्थी व्यसनाधीन होत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या दुकानांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या अमली पदार्थांची खुलेआम विक्री होत आहे. ती थांबवण्यात यावी व त्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात यावी.” अशी मागणी रविंद्र चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य? केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य?
केळं हे एक असं फळ आहे जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. मऊसर, गोडसर आणि ऊर्जा देणारं हे फळ नाश्त्यासाठी आदर्श...
महायुतीच्या काळात कर्जात वाढ, जनतेच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी सरकारने काढला पळ; अंबादास दानवेंची टीका
Chhattisgarh News – नारायणपूरमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार
Mumbai News – बँकॉकहून मुंबईत गांजा तस्करी प्रकरणी मुंबई विमानतळावर प्रवाशाला अटक, सीमाशुल्क विभागाची कारवाई
Photo – सई… बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल
महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, दुकानं नाही शाळाही बंद करेन; राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणावी, युवा पिढीचं भविष्य अंधारात घालायचे पाप करू नका – कैलास पाटील