मुंबईत उद्धव ठाकरे यांची ताकद जास्त – शरद पवार

मुंबईत उद्धव ठाकरे यांची ताकद जास्त – शरद पवार

मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मोठे विधान केले. महाविकास आघाडीमध्ये मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ताकद जास्त आहे. त्यामुळे आगामी निवडणूक मुंबईत कशी लढायची याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे शरद पवार म्हणाले.

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे अपरिहार्य असल्याने निवडणुका येत्या तीन महिन्यांत लागतील अशी शक्यता शरद पवार यांनी वर्तवली आहे.

हिंदीची सक्ती आणि द्वेषही नको

हिंदी भाषेच्या सक्तीबाबतही शरद पवार यांनी या वेळी प्रतिक्रिया दिली. ‘‘हिंदी भाषेची सक्ती असू नये, पण हिंदी भाषेचा द्वेष करणेही विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. एखाद्याला येत असेल किंवा तो शिकत असेल तर नाही बोलण्याचे कारण नाही. विद्यार्थ्याला जे आवडेल ते त्याने करावे. पालकांच्या मार्गदर्शनानुसार त्याने निर्णय घेतला पाहिजे,’’ असे शरद पवार म्हणाले. देशातील 55 ते 60 टक्के लोक हिंदी बोलतात. त्यामुळे सुसंवादासाठी हिंदी भाषेकडे दुर्लक्ष होऊ नये, पण सक्ती करणे योग्य नाहीच, असेही ते पुढे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;