महाउधारी सरकारने थकवली 80 हजार कोटींची बिले, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसून कंत्राटदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न

महाउधारी सरकारने थकवली 80 हजार कोटींची बिले, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसून कंत्राटदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न

महाउधारी सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याने राज्याच्या विविध भागांत विकासकामे करणाऱया कंत्राटदारांची 80 हजार कोटींची बिले थकली आहेत. यामुळे सरकारी कामाचा ठेका घेऊन उदरनिर्वाह चालविणाऱया कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करून न्याय मिळत नसल्याने ऊर्जा विभागाच्या कामाचा ठेका घेणाऱया जळगावातील संजय वराडे या कंत्राटदाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात घुसून अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. जळगाव जिह्यातील या धक्कादायक घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

 जळगावातील आकाशवाणी चौकातून मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना संजय वराडे या कंत्राटदाराने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. संजय वराडे यांनी ऊर्जा विभागाच्या कामाचे कंत्राट घेतले असून या कामाचे पैसे थकले आहेत. त्यातच चिंचोली येथील वीज उपकेंद्राच्या कामाच्या साहित्याची चोरी झाली. यामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

सरकारी अनास्था जबाबदार

निवडणुकीआधी आर्थिक नियोजन न करता कोटय़वधींची विकासकामे काढण्यात आली. यामुळे कंत्राटदार आज अडचणीत आले आहेत. संबंधित खात्याचे मंत्री, सचिव कंत्राटदारांची थकबाकी देण्याबाबत मागील दहा महिन्यांपासून चालढकल करत आहेत. आजच्या घटनेस सरकारी अनास्था जबाबदार असल्याचे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले म्हणाले.

महाराष्ट्राची आर्थिक घडी काही महिन्यांत पुरती विस्कटली असून विकासकामांवर खर्च करण्यासाठी सरकारकडे छदामही उरलेला नाही. काम करूनदेखील पैसे मिळत नसल्याने कंत्राटदार आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱया कामगारांत तीव्र संताप आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लॉस एंजेलिस पोलिस प्रशिक्षण केंद्रात मोठा स्फोट, तीन उप शेरीफ जागीच ठार लॉस एंजेलिस पोलिस प्रशिक्षण केंद्रात मोठा स्फोट, तीन उप शेरीफ जागीच ठार
अमेरिकेतील लॉस एंजेलिस काउंटी शेरीफ विभागाच्या बिस्केलुझ प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी मोठा स्फोट झाला. यात स्फोटात तीन उप शेरीफ अधिकाऱ्यांचा मृत्यू...
केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य?
महायुतीच्या काळात कर्जात वाढ, जनतेच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी सरकारने काढला पळ; अंबादास दानवेंची टीका
Chhattisgarh News – नारायणपूरमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार
Mumbai News – बँकॉकहून मुंबईत गांजा तस्करी प्रकरणी मुंबई विमानतळावर प्रवाशाला अटक, सीमाशुल्क विभागाची कारवाई
Photo – सई… बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल
महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, दुकानं नाही शाळाही बंद करेन; राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान