डोनाल्ड ट्रम्प यांचे आमंत्रण नाकारले, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

डोनाल्ड ट्रम्प यांचे आमंत्रण नाकारले, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेवण आणि चर्चा करण्यासाठी आमंत्रण दिले. मात्र मोदींनी ट्रम्प यांचे निमंत्रण नाकारले. मोदी G7 बैठकीला गेले असताना ट्रम्प यांनी मोदींना फोन करून हे निमंत्रण दिले होते. मात्र महाप्रभूंची धरती ओडिशाला यायचं असल्याने आपण ट्रम्प यांचे निमंत्रण नाकारल्याचे मोदी म्हणाले. ओडिशाच्या लोकांचे प्रेम आणि महाप्रभूच्या भक्तीमुळे आपण ओडिशाकडे ओढलो गेल्याचेही ते पुढे म्हणाले. नरेंद्र मोदी सध्या ओडिशाच्या दौऱ्यावर असून एका सभेला संबोधित करताना त्यांनी हा किस्सा सांगितला.

कॅनडातील अल्बर्टा प्रांतात तीन दिवसांची G7 शिखर परिषद पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शिखर परिषदेला पाहुणे राष्ट्र म्हणून उपस्थिती लावली होती. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी मोदींचे स्वागत केले. यावेळी त्यांनी अनेक जागतिक नेत्यांची भेट घेतली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आता थांबायचं नाय… नीरज चोप्रानं प्रतिष्ठेची पॅरिस डायमंड लीग स्पर्धा जिंकली, जी ज्युलियन वेबरचा बदला घेतला आता थांबायचं नाय… नीरज चोप्रानं प्रतिष्ठेची पॅरिस डायमंड लीग स्पर्धा जिंकली, जी ज्युलियन वेबरचा बदला घेतला
हिंदुस्थानचा स्टार भालाफेकपटू आणि ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेता नीरज चोप्रा याने पॅरिस डायमंड लीग स्पर्धा जिंकली आहे. Neeraj Chopra wins Paris Diamond...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 21 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
अल्प उत्पन्न गटासाठीच्या मुंबईतील 368 भूखंडांवर 30 वर्षे बांधकामच नाही, हायकोर्टाने घेतली गंभीर दखल
विरार लेडीज स्पेशलमध्ये रक्तरंजित घमासान, झिंज्या उपटल्या, डोके फोडले; धक्का लागल्याने लाडक्या बहिणींमध्ये बुक्काबुक्की
महाउधारी सरकारने थकवली 80 हजार कोटींची बिले, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसून कंत्राटदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न
मुंबईत उद्धव ठाकरे यांची ताकद जास्त – शरद पवार
निवडणुकीचे फुटेज आता 45 दिवसांत नष्ट करणार, आयोगाचे सर्व राज्यांना फर्मान