JCB च्या मदतीने नदीतून रेती उत्खनन, प्रशासनाचे दुर्लक्ष

JCB च्या मदतीने नदीतून रेती उत्खनन, प्रशासनाचे दुर्लक्ष

शासनाने वाळू विक्रीसंदर्भात तयार केलेल्या धोरणाला तिलांजली देत जिल्ह्यात खुलेआम वाळूतस्करी सुरू आहे. रेती घाटातून महसूल यंत्रणेच्या नाकावर टिच्चून आणि शासनाचे नियम बाजूला ठेऊन भर दिवसा जेसीबी (JCB) च्या सहाय्याने वाळू माफिया रेती उत्खनन करत असल्याचे निदर्शनास आले.

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन केल जात असून जिल्ह्यातील मुल तालुक्यातील मारोडा गावाजवळील उमा नदीत भर दिवसा JCB च्या मदतीने ट्रक व ट्रॅक्टर मध्ये रेती भरत असताना च चित्र कॅमेरात कैद करण्यात आलं. 10 जून पासून रेती घाट बंद करण्याचे आदेश असतानाही मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरूच असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. मुल तालुक्यात आठ रेती घाट आहे आणि या आठ ही रेती घाटाचे लिलाव करण्यात आले आहे. नियम बाजूला ठेवून अजस्त्र यंत्र लावून बेसुमार रेती उपसा सुरू आहे. त्यामुळे रेती घाटांवर महसूल विभागाचे अप्रत्यक्ष सहकार्य तर नाही ना? असा सवाल उपस्थित केल्या जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;