मिंधे गटात जाणे ही फार मोठी चूक, पण आता माझ्या माहेरी परतले; सुजाता शिंगाडे यांचा शिवसेनेत प्रवेश

मिंधे गटात जाणे ही फार मोठी चूक, पण आता माझ्या माहेरी परतले; सुजाता शिंगाडे यांचा शिवसेनेत प्रवेश

मिंधे गटातील सुजाता शिंगाडे यांनी आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला. यावेळी त्यांनी मी माझ्या माहेरी परतले आहे, अशा भावना व्यक्त केल्य़ा.

”मी 30 जानेवारीला शिंदे गटात प्रवेश केला होता. ती माझी फार मोठी चूक होती. ओरिजिनल शिवसेना उद्धव साहेबांचीच शिवसेना आहे. मी सगळ्या पदांपर्यंत मातोश्रीमुळे पोहोचलेय. गेली पस्तीस वर्ष मी संघटनेसाठी काम करतेय. पण तिथे गेल्यावर चार महिन्यातच मला असा अनुभव आला की मी शिंदे गटात राहूच शकत नाही. अनेकदा रात्री मला झोप लागत नव्हती. आपण फार मोठी चूक केली आहे याची जाणीव होत होती. आमच्या विभागातील काही हेव्यादेव्यांमुळे रागाच्या भरात मी तिथे गेले त्यासाठी आता मी दिलगिरी व्यक्त करते. पुन्हा एकदा मी माझ्या माहेरी आले, माझ्या घरी परतले. आता खूप बरं वाटतंय. 35 वर्ष मी प्रामाणिकपणे संघटनेचं काम केलेलं आहे. आता कुणी तिथे जाऊ नये हे असं मला वाटतं. जे गेलेयत त्यांनीही परत यावं. कारण जे प्रेम मातोश्रीला मिळतं ते कुठेही मिळत नाही. दोन दिवसांपासून वहिणींनी मला इतकं सांभाळून घेतलं. आज त्या माँ साहेबांसारखीच जागा चालवत आहे”, असे सुजाता शिंगाडे म्हणाल्या.

”मी शिंदे गटात गेल्यानंतर कांदिवली चारकोप येथील 22 शाखांमध्ये मला मिटिंग घ्यायला लावल्या होत्या. तिथे एकही शाखाप्रमुख व्यवस्थित नाही, गटप्रमुख नाही. कुणाचा कुणाशीही ताळमेळ नाही. अंदाधुंदी कारभार सुरू आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पैसे देऊन लोकांना विकत घेतलं. पैशाच्या आमिषाला बळी पडून लोकं तिथे गेली मात्र त्यांनाही आता पश्चाताप होतोय. शिंदे कुणाकडेही आता बघत नाहीए. मधले जे एजंट आहेत तेच लोकांना फसवतायत. मलाही त्यांनीच फसवलं आणि मी तिथे गेले’, असे शिंगाडे म्हणाल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;