ट्रॅकखालची माती वाहून गेली, रुळांना तडे; शेळीपालन करणाऱ्या मुलाच्या सतर्कतेमुळे वाचले शेकडो जीव

ट्रॅकखालची माती वाहून गेली, रुळांना तडे; शेळीपालन करणाऱ्या मुलाच्या सतर्कतेमुळे वाचले शेकडो जीव

उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे मोठी रेल्वे दुर्घटना टळली. सफीपूर रेल्वे स्थानकाजवळ ट्रॅकखालची माती वाहून गेली आणि रुळाला तडे गेल्याने मोठा रेल्वे अपघात होणार होता. मात्र तेथेच शेळ्या चारत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या ही बाब लक्षात आली आणि मोठा अपघात टळला.

सफीपूर रेल्वे स्थानकाजवळ 16 वर्षांचा सृजन मिश्रा शेळ्या चारत होता. यावेळी रेल्वेस्थानकाजवळील दाबौली वळणावर ट्रॅकखालील माती वाहून गेलेली आणि रुळाला तडे पडलेले त्याला दिसले. याचदरम्यान कानपूर-बलामाऊ पॅसेंजर ट्रेन सफीपूर स्थानकातून निघाली होती. ट्रॅकची स्थिती पाहून सृजनने तात्काळ सतर्कता दाखवत त्याने आपला लाल रंगाचा टी-शर्ट काढला आणि तो हलवू लागला. लाल रंगाचं कापड पाहून ट्रेनच्या लोको पायलटने ट्रेन थांबवली आणि एक मोठा अपघात टळला.

यानंतर रेल्वे ट्रॅकची माहिती प्रशासनाला देण्यात आली. माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ट्रॅक दुरुस्त केला आणि त्यानंतर तेथून ट्रेन सोडण्यात आली. सृजनमुळे मोठा अपघात टळल्याने त्याचे संपूर्ण परिसरात खूप कौतुक होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;