Skin Care- तेलकट चेहऱ्यासाठी हे घरगुती फेसपॅक आहेत रामबाण उपाय

Skin Care- तेलकट चेहऱ्यासाठी हे घरगुती फेसपॅक आहेत रामबाण उपाय

प्रत्येक मुलीला महिलेला तिचा चेहरा सुंदर असावा असे वाटत असते. परंतु अनेकदा प्रदुषणामुळे चेहऱ्याची अक्षरशः वाट लागते. सुंदर चेहऱ्यातील अडसर म्हणजे तेलकट त्वचा. तेलकट त्वचेच्या लोकांना अधिक व्हाइटहेडस्च्या समस्येचा सामना करावा लागतो. तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर मुरमांचे प्रमाण वाढते. हे मुरुम मोठे झाल्यावर, चेहरा अधिक विद्रुप दिसू लागतो. म्हणूनच तेलकट त्वचा असणाऱ्यांना त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. योग्य निगा राखल्यास तेलकट त्वचा सुद्धा चांगली कोमल मुलायम त्वचा होऊ शकते.

चेहऱ्यावर तेलकटपणामुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स वाढतात. त्यामुळेही चेहरा खराब दिसू लागतो. अशावेळी मूळ कारणांवर उपाय करणे गरजेचे आहे. यातील मूळ कारण आहे त्वचेचा तेलकटपणा. त्वचेच्या तेलकटपणावर आपण घरगुती उपायांचा अवलंब करु शकतो.

लिंबाचा रस आणि दालचिनी पावडर – एका भांड्यात दोन चमचे लिंबाचा रस आणि एक चमचा दालचिनी पावडर घ्या. त्याची चांगली पेस्ट बनवा. काही मिनिटांसाठी हलक्या हाताने मालिश करा. 15-20 मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवावा.

स्ट्रॉबेरी आणि तांदळाचे पीठ – 1 किंवा 2 ताज्या स्ट्रॉबेरी घ्याव्यात लहान तुकडे करून नीट मॅश करावे. त्यात एक चमचा तांदळाचे पीठ घालून मिक्स करावे. त्यानंतर चेहरा व मान या भागांवर हे मिश्रण लावावे. त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी काही मिनिटांसाठी हलक्या हाताने मालिश करा. मिश्रण त्वचेवर 5-8 मिनिटे ठेवा. नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवावा.

बेकिंग सोडा आणि पाणी – एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात थोडेसे पाणी घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि हळूवारपणे मालिश करा. किमान 5-10 मिनिटे हे मिश्रण तसेच राहू द्यावे. नंतर पाण्याने तोंड धुवा. आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा याची पुनरावृत्ती करा.

(कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लॉस एंजेलिस पोलिस प्रशिक्षण केंद्रात मोठा स्फोट, तीन उप शेरीफ जागीच ठार लॉस एंजेलिस पोलिस प्रशिक्षण केंद्रात मोठा स्फोट, तीन उप शेरीफ जागीच ठार
अमेरिकेतील लॉस एंजेलिस काउंटी शेरीफ विभागाच्या बिस्केलुझ प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी मोठा स्फोट झाला. यात स्फोटात तीन उप शेरीफ अधिकाऱ्यांचा मृत्यू...
केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य?
महायुतीच्या काळात कर्जात वाढ, जनतेच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी सरकारने काढला पळ; अंबादास दानवेंची टीका
Chhattisgarh News – नारायणपूरमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार
Mumbai News – बँकॉकहून मुंबईत गांजा तस्करी प्रकरणी मुंबई विमानतळावर प्रवाशाला अटक, सीमाशुल्क विभागाची कारवाई
Photo – सई… बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल
महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, दुकानं नाही शाळाही बंद करेन; राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान