Virar Local Fight पश्चिम रेल्वे लेडीज स्पेशलमध्ये तुफान राडा, महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण

Virar Local Fight पश्चिम रेल्वे लेडीज स्पेशलमध्ये तुफान राडा, महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण

मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेन गर्दीमुळे सतत चर्चेचा विषय ठरत आहे. त्यात विरार लोकल म्हणाल तर प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते मात्र पश्चिम रेल्वेवरील एका लोकलमध्ये महिलांच्या डब्यातील हाणामारीचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. संध्याकाळच्या सुमारास झालेल्या या घटनेत महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारातील एका महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेतील ही महिलेला लोकलच्या दारावरच भांडत असल्याने इतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. चर्चगेट विरार महिला स्पेशल लोकलमधील प्रकार असल्याचे समोर आले आहे.

पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट-विरार या महिला विशेष लोकल ट्रेनमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. 17 जून रोजी घडलेल्या या घटनेत हाणामारीच्या दरम्यान एका महिलेच्या डोक्याला दुखापत झाली. धावत्या लोकलमध्ये दारावरच हा सगळा प्रकार सुरू असल्याने इतर महिला प्रवासी घाबरल्या होत्या. चर्चगेटवरुन सुटलेली महिला विशेष लोकल अंधेरी स्थानकात आली असता ट्रेनमध्ये चढणाऱ्या महिलेचा दारावर उभ्या राहिलेल्या महिला प्रवाशाला धक्का लागला. याच कारणावरुन दोघांमध्ये जोरदार वाद सुरु झाला. हा वाद इतका वाढला की दोघांमध्ये हाणामारी सुरु झाली. दोन्ही महिलांना एकमेकींचे केस ओढून मारहाण सुरु केली. दारावर उभ्या असलेल्या तरुणीने दुसऱ्या महिलेच्या डोक्यात मोबाईलने मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये महिलेच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं. तरीही ती थांबली नाही. त्यानंतर महिलांना दोघांनाही बाजूला केलं.दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून काही महिला प्रवाशांनी दार लावून घेतले. प्रत्यक्षदर्शींच्या नुसार मारहाण करणाऱ्या महिलेने दुसऱ्या महिलेला दाराच्या बाहेरही ढकलल्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढील स्थानकावर दोन्ही महिलांना उतरवण्यात आलं.

याअगोदरही विरार महिला लोकलमध्ये मारहाणीचे प्रकार

– विरार लोकल ट्रेनमध्ये 17 एप्रिल रोजी सायंकाळी राज्य महिला आयोगप्रमुख रुपाली चाकणकरांचे नाव घेत दुसऱ्या महिला सहप्रवाश्याला धमकावल्याची, मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत एका महिलेने दुसऱ्या महिलेला मारहाण करत धमकावले; यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

– जुलै 2016 मध्ये 20 वर्षीय ऋतुजा नाईकला वसईला जायचं होतं. त्यासाठी तिने विरार-चर्चगेट लोकल पडकली. महिलांच्या सेकंड डब्यात तिने प्रवास सुरु केला. मात्र वसई आल्यानंतर जेव्हा तिने उतरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा बाकीच्या महिला प्रवाशांचा पारा चढला. महिलांच्या टोळक्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ऋतुलाजा अस्थमाचा अटॅकही आला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;