IND vs ENG 1st Test – साई सुदर्शनचं पदार्पण; कोहली, द्रविड, गांगुलीच्या खास क्लबमध्ये एन्ट्री!

IND vs ENG 1st Test – साई सुदर्शनचं पदार्पण; कोहली, द्रविड, गांगुलीच्या खास क्लबमध्ये एन्ट्री!

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. दोन्ही उभय संघात हेडिंग्लेच्या लीड्स येथे पहिला सामना खेळला जात आहे. या लढतीत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून हिंदुस्थानला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. या लढतीत इंडियन प्रीमियर लीगमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या साई सुदर्शन याला पदार्पणाची संधी मिळाली आहे. हिंदुस्थानचा दिग्गज खेळाडू चेतेश्वर पुजारा याने त्याला टीम इंडियाची कॅप सोपवली.

साई सुदर्शन हिंदुस्थानकडून कसोटी क्रिकेट खेळणारा 317 वा खेळाडू आहे. 23 वर्षीय साई सुदर्शन सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडल्यानंतर त्याने टी20 क्रिकेटमध्येही आपली छाप पाडली. नुकत्याच झालेल्या आयपीएल 2025 मध्ये साई सुदर्शनने गुजरात टायटन्स संघाकडून खेळताना 700 हून अधिक धावा चोपत ऑरेंज कॅप जिंकली होती.

कोहली, द्रविड, गांगुलीच्या क्लबमध्ये एन्ट्री!

दरम्यान, साई सुदर्शन याने विराट कोहली, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली या दिग्गज फलंदाजांच्या खास क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. या तिघांनीही 20 जून रोजीच कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. विराट कोहली याने वेस्ट इंडिजविरुद्ध किंग्स्टन येथे पहिला सामना खेळला होता. तर राहुल द्रविड आणि सौरव गांगुलीने इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्समध्ये 20 जूनला आपला पदार्पणाचा कसोटी सामना खेळला होता.

साई सुदर्शन तिसऱ्या क्रमांकावर खेळणार

दरम्यान, नाणेफेक झाल्यानंतर कर्णधार शुभमन गिल म्हणाला की, ‘आम्हीही प्रथम गोलंदाजी घेतली असती. पण आमची तयारी जोरात आहे. ऊन पडले असून फलंदाजीसाठी चांगले वातावरण आहे. आम्ही बेकेनहॅममध्ये सराव सामना खेळला होता, त्यामुळे खेळाडूही तयारीत आहेत. साई सुदर्शन पदार्पण करत असून करुण नायरचेही संघात पुनरागमन झाले आहे. साई सुदर्शन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल.’

पहिल्या कसोटीसाठी हिंदुस्थानचा संघ

यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत, करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा

इंग्लंडचा संघ –

जॅक क्राऊली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जॅमी स्मिथ, क्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जॉश टंग आणि शोएब बशीर.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;