IND Vs ENG 1st Test – टीम इंडियाची ‘यशस्वी’ सुरुवात; जैसवालनं ठोकलं शतक, कर्णधारही जोमात

IND Vs ENG 1st Test – टीम इंडियाची ‘यशस्वी’ सुरुवात; जैसवालनं ठोकलं शतक, कर्णधारही जोमात

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना लिड्स येथे खेळला जात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली आहे. सलामीला आलेल्या यशस्वी जैसवालने खणखणीत शतक ठोकत आपले इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याला टी ब्रेकनंतर कर्णधार बेन स्टोक्सने बाद केलं.

यशस्वीने सलामीला येत 159 चेंडूंचा सामना करत 16 चौकार आणि 1 षटकार खेचत 101 धावा केल्या. यशस्वी चांगल्या लयीत दिसत होता. परंतु बेन स्टोक्सने त्याचा त्रिफळा उडवत त्याला तंबुत धाडले. त्याला केएल राहुल (42) आणि कर्णधार शुभमन गिलने चांगली साथ मिळाली. त्यामुळे टीम इंडियाने तिसऱ्या सत्रात 200 चा आकडा पार केला आहे. टी ब्रेकनंतर टीम इंडियाला यशस्वीच्या स्वरुपात तिसरा हादरा बसला. पहिलाच सामना खेळणाऱ्या साई सुदर्शनला मात्र भोपळा फोडता आला नाही. सध्या सामना सुरू असून 54 षटकांच्या अंती टीम इंडियाने 3 गड्यांच्या मोबदल्यात 226 धावा केल्या आहेत. कर्णधार शुभमन गिल (नाबाद 67) आणि ऋषभ पंत (नाबाद 06) नाबाद खेळत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;