हिंदुस्थानींचा स्वीस बँकेतील पैसा तिप्पट झाला, मोदी काळा पैसा परत आणणार होते…

हिंदुस्थानींचा स्वीस बँकेतील पैसा तिप्पट झाला, मोदी काळा पैसा परत आणणार होते…

स्वीस बँकेतील काळा पैसा परत आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 वर्षांपूर्वी दिलेले आश्वासन इतर आश्वासनांप्रमाणेच एक जुमला ठरले आहे. काळा पैसा परत येण्याचे सोडाच, स्वीस बँकेतील हा पैसा वर्षागणिक वाढत चालला आहे. मागील 2024 या वर्षात स्वीस बँकेतील हिंदुस्थानींचा काळा पैसा तिपटीहून जास्त वाढला आहे.

स्वीस नॅशनल बँकेने नुकतीच यासंदर्भातील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार 2024 या वर्षात स्वीस बँकेत हिंदुस्थानींनी सुमारे 37,600 कोटी रुपये जमा केले आहेत. 2021नंतरची ही सर्वात मोठी रक्कम आहे. वाढलेल्या रकमेपैकी बहुतांश रक्कम ही वित्तीय संस्थांच्या खात्यावरील आहे. व्यक्तिगत खात्यांतील रकमेत 11 टक्के म्हणजेच 3675 कोटी इतकी वाढ झाली आहे.

2014च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाचा मुद्दा जोरकसपणे मांडला होता. स्वीस बँकेतील काळा पैसा हिंदुस्थानात परत आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये पाठवणार, असे मोदी सांगत होते. त्यांच्या या आश्वासनावर विश्वास ठेवून जनतेने त्यांना भरभरून मतेही दिली होती. मात्र हे 15 लाख रुपये कोणालाही मिळाले नाहीत. उलट स्वीस बँकेतील पैसा वाढला आहे.

आता प्रत्येकाला 45 लाख मिळणार?

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याच मुद्द्यावरून उपरोधिक ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. ‘‘भारतीयांचा स्वीस बँकेत ठेवलेला पैसा 2024मध्ये तिपटीने वाढला? मग आता आपल्याला 15 लाखांऐवजी 45 लाख मिळणार? मोदींचे आणि एक खोटे आश्वासन,’’ असा बोचरा टोला त्यांनी हाणला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;