मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद जास्त…; BMC निवडणुकीवर शरद पवार यांचं मोठं विधान

मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद जास्त…; BMC निवडणुकीवर शरद पवार यांचं मोठं विधान

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. मुंबईत आम्हा सर्वांमध्ये शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ताकद जास्त आहे, असे शरद पवार म्हणाले. माध्यमांशी संवाद साधत असताना शरद पवारांनी हे विधान केले.

महाविकास आघाडी म्हणून मुंबईत एकत्र लढणार की वेगळे? असा प्रश्न शरद पवार यांना पत्रकारांनी विचारला होता. त्यावर उत्तर देत शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. “अजून काही चर्चा झालेली नाही. पण मुंबईमध्ये आमच्या सगळ्यांमध्ये अधिक ताकद ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आहे. त्यामुळे त्यांना त्यात विचारात घ्यावं लागेल”, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामध्ये ठाण्यातल्या अब्दुल्लाचे काय काम? संजय राऊत यांनी मिंध्यांना फटकारले

“सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला आहे. त्या निकालानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबवता येणार नाहीत. त्यामुळे साधारणतः तीन महिन्यांच्या आत ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. त्यात आम्ही सगळे सहभागी होऊ. आमचा प्रयत्न आहे, निर्णय अद्याप नाही, कारण आम्ही अजून चर्चा केलेली नाही. काँग्रेस आहे, आमचा पक्ष आहे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आहे आणि शेतकरी कामगार पक्ष आणि इतर छोटे पक्ष आहेत. आम्ही एकत्र बसू. आणि एकत्र निवडणुकीला सामोरं जाता येईल का? याचा विचार करू. त्याचा अंतिम निर्णय करू. एकत्र निवडणूक लढवायची इच्छा आहे”, असे शरद पवार म्हणाले.

देशाला पंतप्रधान नाही… भाजपला आहे; उद्धव ठाकरे यांचा आसूड कडाडला

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लॉस एंजेलिस पोलिस प्रशिक्षण केंद्रात मोठा स्फोट, तीन उप शेरीफ जागीच ठार लॉस एंजेलिस पोलिस प्रशिक्षण केंद्रात मोठा स्फोट, तीन उप शेरीफ जागीच ठार
अमेरिकेतील लॉस एंजेलिस काउंटी शेरीफ विभागाच्या बिस्केलुझ प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी मोठा स्फोट झाला. यात स्फोटात तीन उप शेरीफ अधिकाऱ्यांचा मृत्यू...
केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य?
महायुतीच्या काळात कर्जात वाढ, जनतेच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी सरकारने काढला पळ; अंबादास दानवेंची टीका
Chhattisgarh News – नारायणपूरमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार
Mumbai News – बँकॉकहून मुंबईत गांजा तस्करी प्रकरणी मुंबई विमानतळावर प्रवाशाला अटक, सीमाशुल्क विभागाची कारवाई
Photo – सई… बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल
महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, दुकानं नाही शाळाही बंद करेन; राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान