Air India Plane Crash- अपघातातील मृत महिलेबद्दल केली असंवेदनशील टिप्पणी; सरकारी अधिकाऱ्याचे निलंबन

Air India Plane Crash- अपघातातील मृत महिलेबद्दल केली असंवेदनशील टिप्पणी; सरकारी अधिकाऱ्याचे निलंबन

गेल्या आठवड्यात अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात 200 हून अधित जणांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भयंकतर होता की संपूर्ण देशभरात शोककळा पसरली. प्रत्येकाने या मृतांबद्दल संवेदना व्यक्त केली. मात्र या अपघातात मृत्यू झालेल्या एका परिचारेकेविरोधात केरळच्या एका सरकारी कर्मचाऱ्याने असंवेदनशील पोस्ट लिहिली. याप्रकरणी आता केरळच्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

रंजीता जी नायर (39) असे विमान अपघातात मृत पावलेल्या परिचारिकेचे नाव आहे. तर ए. पवित्रन असे केरळच्या सरकारी कर्मचाऱ्याचे नाव आहे. ए. पवित्रन हे कासरगोड जिल्ह्यातील वेल्लारीकुंडू तालुका कार्यालयातील कनिष्ठ अधीक्षक होते. ए. पवित्रन यांनी मृत परिचारिका रंजीताच्या जातीबद्दल आणि सरकारी नोकरीच्या दर्जाबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली होती. यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली असल्याचे, महसूल मंत्री के. राजन यांनी सांगितले.

केरळच्या सरकारी अधिकाऱ्याने केलेले हे अगदी घृणास्पद आहे. ही पोस्ट माझ्या लक्षात आल्यानंतर त्यांना निलंबित करण्याचा आदेश लगेचच जारी करण्यात आला,असे महसूल मंत्री के. राजनमहसूल मंत्री के. राजन म्हणाले. पवित्रन यांनी रंजीताबद्दल केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये तिच्या जातीचा उल्लेख केला होता. केरळच्या नायर नावाच्या एका महिलेचे विमान अपघातात निधन झाले. दुसऱ्याची संधी डावलून ती एका सरकारी नोकरीतून रजा घेऊन लंडनला चालली होती. काहीही वाटत नाही. सर्वांना संवेदना, असे पवित्रन यांनी पोस्टमध्ये म्हटले.

केरळमध्ये नायर समुदाय हा उच्च जातीचा गट मानला जातो. दरम्यान अपघातातील बळींसाठी शोक व्यक्त होत असताना आणि अनेकांनी पवित्ररन यांच्या टिप्पण्या असंवेदनशील आणि जातीयवादी असल्याचे म्हटले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मेरिल MyClipची, गंभीर मायट्रल रेगर्गिटेशनच्या उपचारांसाठी भारतातील पहिली ट्रान्सकॅथेटर-एज-टू-एज रिपेअर (TEER) प्रणाली मेरिल MyClipची, गंभीर मायट्रल रेगर्गिटेशनच्या उपचारांसाठी भारतातील पहिली ट्रान्सकॅथेटर-एज-टू-एज रिपेअर (TEER) प्रणाली
वापी, गुजरात – जागतिक स्तरावरील अग्रगण्य मेड-टेक कंपनी, मेरिल लाइफ सायन्सेसने (Meril Life Sciences), १४ जून रोजी मायक्लिप (MyClip) या...
पतंजलीचे खास आयुर्वेदिक औषध, सर्दी-खोकला, डोकेदुखीला करा बाय-बाय
फक्त साखरेमुळे मधुमेह होत नाही, तर या पदार्थांमुळे वाढते रक्तातील साखर, जाणून आश्चर्य वाटले
ट्रॅकखालची माती वाहून गेली, रुळांना तडे; शेळीपालन करणाऱ्या मुलाच्या सतर्कतेमुळे वाचले शेकडो जीव
Railway Update : पालघर रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे सेवा ठप्प
प्रेमात बाप झाला वेडा! स्वत:च्या अल्पवयीन मुलाला अडकवलं लग्नाच्या बेडीत, पितळ उघडं पडताच झाला पसार
Skin Care- तेलकट चेहऱ्यासाठी हे घरगुती फेसपॅक आहेत रामबाण उपाय