लग्नसमारंभाहून घरी परतत असताना वऱ्हाडावर काळाचा घाला, ट्रकच्या धडकेत कारमधील 9 जण ठार

लग्नसमारंभाहून घरी परतत असताना वऱ्हाडावर काळाचा घाला, ट्रकच्या धडकेत कारमधील 9 जण ठार

लग्न समारंभ आटोपून घरी परतत असताना वऱ्हाडावर काळाने झडप घातली. भरधाव ट्रकला कारची जोरदार धडक झाली आणि यात कारमधील 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात कारचाही चक्काचूर झाला. कारला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकही अनियंत्रित झाला आणि जवळच्या शेतात उलटला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

पश्चिम बंगालमधील पुरुलिया-जमशेदपूर राष्ट्रीय महामार्ग 18 वर ही घटना घडली. झारखंडमधील 9 जण लग्नसमारंभासाठी पश्चिम बंगालमध्ये गेले होते. लग्न समारंभ आटोपून सर्वजण आपल्या गावी परतत होते. यादरम्यान पुरुलिया-जमशेदपूर राष्ट्रीय महामार्ग 18 वरील बलरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार चालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला कारने धडक दिली.

कारला वाचवण्याच्या नादात ट्रकही अनियंत्रित होऊन उलटला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;