रणथंबोरची प्रसिद्ध वाघीण ‘अ‍ॅरोहेड’चा मृत्यू; मेंदूच्या ट्युमरमुळे वयाच्या 11 व्या वर्षी निधन

रणथंबोरची प्रसिद्ध वाघीण ‘अ‍ॅरोहेड’चा मृत्यू; मेंदूच्या ट्युमरमुळे वयाच्या 11 व्या वर्षी निधन

रणथंबोर नॅशनल पार्कमधील प्रसिद्ध वाघीण ‘अ‍ॅरोहेड’ (T-84) हिचा मेंदूच्या ट्युमरमुळे गुरुवारी मृत्यू झाला, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. अ‍ॅरोहेड ही रणथंबोरची दंतकथा बनलेली वाघीण ‘मच्छली’ हिची नात होती.

11 वर्षांची अ‍ॅरोहेड काही दिवसांपूर्वीच एका मगरीला शिकार करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आली होती. तिच्या या शिकारीने लोकांना मच्छलीची आठवण करून दिली – जिचे वर्णन अनेकदा ‘रणथंबोरची राणी’ आणि ‘मगरीची शिकारीण’ असं केलं जायचं.

वनविभागाचे अधिकारी आणि वन्यजीवप्रेमींनी अ‍ॅरोहेडला श्रद्धांजली अर्पण केली आणि नंतर तिचे दहन करण्यात आले.

‘अ‍ॅरोहेडने मच्छलीची परंपरा पुढे नेली’, असे वरिष्ठ वनमार्गदर्शक शकीर अली यांनी सांगितले.

रणथंबोरचे क्षेत्र संचालक अनुप के.आर. यांच्या मते, अ‍ॅरोहेडचा जन्म फेब्रुवारी 2014 मध्ये झाला होता. ती प्रामुख्याने झोन 2, 3, 4 आणि 5 मध्ये दिसून यायची, विशेषतः नाल घाटी आणि राजबाग तलाव हे तिचे आवडते क्षेत्र होते.

‘ती केवळ देखण्या रूपामुळेच नव्हे, तर पार्कमधील वाघांची संख्या वाढवण्यात मोलाची भूमिका बजावल्यामुळेही ओळखली जायची’, असे अनुप यांनी सांगितले.

अ‍ॅरोहेडने चार वेळा पिल्लांना जन्म दिला होता. ती एकूण दहा पिल्लांची आई होती, यापैकी सहा अजूनही जिवंत आहेत. शेवटचा बछडा 2023 मध्ये झाला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;