Category
पुणे
पुणे 

कितीही मोठ्या बापाचा असू दे टायरमध्ये घालून झोडा, अजितदादांचे आदेश

कितीही मोठ्या बापाचा असू दे टायरमध्ये घालून झोडा, अजितदादांचे आदेश वाहतुकीच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. नियमांचे उल्लंघन करणारा माझा नातेवाईक असला तरी त्याला टायरमध्ये घालून झोडायला सांगणार आहे, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत बोलताना दिला आहे. अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी बारामती येथील सावित्री हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. यावेळी...
Read More...
पुणे 

बेळगावातील कन्नड सक्तीच्या विरोधात मराठी भाषिक रस्त्यावर उतरणार!

बेळगावातील कन्नड सक्तीच्या विरोधात मराठी भाषिक रस्त्यावर उतरणार! कन्नड अंमलबजावणी प्राधिकरणाकडून सीमाभागात कन्नड सक्तीला सुरुवात केली आहे. बेळगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौरांच्या वाहनांवरील नामफलक आणि नंबरप्लेट मराठी, इंग्रजीमधून काढून फक्त कन्नड भाषेत लावण्यात आली आहे. भगवा झेंडाही उतरविण्यात आला आहे. केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार करूनही होत असलेल्या या कन्नड सक्तीविरोधात...
Read More...
पुणे 

भाजपशासित बेळगाव पालिकेतून मराठी हटवली; सक्तीचे कानडीकरण, भगवा ध्वजही काढला, मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप

भाजपशासित बेळगाव पालिकेतून मराठी हटवली; सक्तीचे कानडीकरण, भगवा ध्वजही काढला, मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप कोल्हापूर बेळगावसह सीमाभागात कानडीकरणाच्या सक्तीचा वरवंटा फिरवला जात असून, मराठी भाषिकांच्या हक्कांची पायमल्ली केली जात आहे. भाजपची सत्ता असलेल्या बेळगाव महापालिकेतून मराठी भाषाच हटविली जात आहे. सर्व कागदपत्रे, व्यवहाराची भाषा फक्त कन्नड करण्याचा फतवा काढला आहे. महापौर, उपमहापौरांच्या वाहनांवरील नामफलक...
Read More...
पुणे 

विठुरायाच्या मंदिराला एक कोटीचा चांदीचा दरवाजा, अहिल्यानगरच्या दोन भक्तांकडून अर्पण

विठुरायाच्या मंदिराला एक कोटीचा चांदीचा दरवाजा, अहिल्यानगरच्या दोन भक्तांकडून अर्पण पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी भाविकांकडून मोठय़ा प्रमाणात दान दिले जाते. नुकतीच आषाढी एकादशी झाली असून या काळात मोठय़ा प्रमाणात विठुरायाच्या चरणी दान आले. अहिल्यानगर येथील दोन व्यापाऱ्यांनी मिळून तब्बल 1 कोटी 10 लाख रुपयांचा 87 किलो चांदीचा दरवाजा अर्पण...
Read More...
पुणे 

शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्याचा दबदबा

शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्याचा दबदबा राज्य परीक्षा परिषद पुणेमार्फत फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेमध्ये इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत ग्रामीण विभागात कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थी राज्यात पहिले आले. विशेष...
Read More...
पुणे 

कोल्हापूर जिल्ह्यात सर्व धरणातील पाणीसाठा 80 टक्क्यांहून अधिक, पंचगंगा नवव्या दिवशी पुन्हा पात्रात

कोल्हापूर जिल्ह्यात सर्व धरणातील पाणीसाठा 80 टक्क्यांहून अधिक, पंचगंगा नवव्या दिवशी पुन्हा पात्रात कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर किंचित ओसरला आहे. शहर आणि परिसरात दिवसभर कडकडीत ऊन पाहावयास मिळत आहे, शिवाय धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाल्याने, नद्यांच्या पाणीपातळीत संथ गतीने घट होत आहे. यंदा दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडलेल्या पंचगंगेचे पाणी...
Read More...
पुणे 

ठेकेदारांना पोसण्यासाठी सरकारकडून ‘शक्तीपीठ’चा घाट! गडहिंग्लज येथे सर्वपक्षीयांचा रास्ता रोको, संकेश्वर-बांदा महामार्ग रोखला

ठेकेदारांना पोसण्यासाठी सरकारकडून ‘शक्तीपीठ’चा घाट! गडहिंग्लज येथे सर्वपक्षीयांचा रास्ता रोको, संकेश्वर-बांदा महामार्ग रोखला सरकार करू पाहत असलेला शक्तिपीठ महामार्ग म्हणजे विनाकारण राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आर्थिक बोजा टाकण्याचा प्रकार आहे. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून या रस्त्याच्या माध्यमातून ठेकेदारांना पोसून त्यातून पैसे काढण्याचा उद्योग सुरू आहे. त्यामुळे भूमिपुत्राला संकटात टाकणाऱ्या या शक्तिपीठ महामार्गाला शेतकरी व जनतेने एकजुटीने...
Read More...
पुणे 

सेवा बजावतानाच ‘कूपर’ गेला; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, सांगली पोलीस दलात 287 गुन्ह्यांच्या तपासात सहभाग

सेवा बजावतानाच ‘कूपर’ गेला; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, सांगली पोलीस दलात 287 गुन्ह्यांच्या तपासात सहभाग गेल्या सहा वर्षांपासून सांगली पोलीस दलाचा एक भाग असलेल्या आणि 287 गुन्ह्यांच्या तपासात सहभाग असलेल्या कूपर श्वानाचे निधन झाले. ऑनडय़ुटी असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे निधन झाले. ‘कूपर’ गेला या बातमीने सारे पोलीस दल हळहळले. त्याच्यावर पोलीस मुख्यालयाच्या...
Read More...
पुणे 

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा…गुरुपौर्णिमेनिमित्त तीर्थस्थळी गर्दी, अक्कलकोट-शिर्डी-नृसिंहवाडीत दर्शनासाठी रीघ

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा…गुरुपौर्णिमेनिमित्त तीर्थस्थळी गर्दी, अक्कलकोट-शिर्डी-नृसिंहवाडीत दर्शनासाठी रीघ ‘अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय..!’ च्या जयघोषात श्रीक्षेत्र अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. तसेच देशभरात अन्न हे पूर्णब्रह्माची साक्ष देणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या धर्मादाय न्यास संस्थेचा 38वा वर्धापन...
Read More...
पुणे 

31 हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, पाचवीचा निकाल 23.90 तर आठवीचा 19.30 टक्के

31 हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, पाचवीचा निकाल 23.90 तर आठवीचा 19.30 टक्के महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या  माध्यमातून घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. इयत्ता पाचवीचा  निकाल 23.90 टक्के तर इयत्ता आठवीचा निकाल 19.30 टक्के एवढा लागला आहे. इयत्ता पाचवीच्या 16 हजार 693...
Read More...
पुणे 

ट्रेंड – आजीबाईंची कमाल

ट्रेंड – आजीबाईंची कमाल मनात जिद्द असेल, इच्छाशक्ती असेल तर वय काय चीज आहे. नव्वद वर्षांहून अधिक वय असणाऱ्या आणि या वयातही लेण्याद्री डोंगर पायी चढणाऱ्या आजीबाईकडे बघितले तर याचा प्रत्यय येतो. आजीचे वय आणि डोंगर चढण्याची इच्छाशक्ती पाहून कोणीही थक्क होईल. तिचा व्हिडीओ...
Read More...
पुणे 

नांदुर मधमेश्वर बंधाऱ्यातून 43 हजारांचा विसर्ग, गोदावरी नदीला पूर

नांदुर मधमेश्वर बंधाऱ्यातून 43 हजारांचा विसर्ग, गोदावरी नदीला पूर सोमवारी दिवसभरातील पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी धरणातील विसर्ग मात्र कायम आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने 43882 क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदीला पूर आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून दारणा आणि गंगापूर धरणाच्या पाणलोटात जोरदार...
Read More...