दिवसभर ताजेतवाने राहायचे असल्यास ग्रीन टी का ब्लॅक काॅफी कोणता पर्याय सर्वोत्तम वाचा

दिवसभर ताजेतवाने राहायचे असल्यास ग्रीन टी का ब्लॅक काॅफी कोणता पर्याय सर्वोत्तम वाचा

सध्या आपल्यापैकी प्रत्येकजण आरोग्याच्या काही ना काही तक्रारीने ग्रस्त आहे. आरोग्याच्या तक्रारी अनेकांच्या तर पाचवीला पुजलेल्या आहेत. अशा या सर्व घडामोडीत आपली लाईफस्टाइल आणि आहार याचाही फार महत्त्वाचा वाटा आहे. निरोगी राहण्यासाठी आपली लाइफस्टाइल सुधारणं हे फार गरजेचं आहे. म्हणूनच आपली आवड निवड जपताना आपले आरोग्य जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण सध्या केवळ ब्लॅक कॉफी पिण्याकडे लक्ष देऊ लागले आहेत. तर ग्रीन टी ची क्रेझ तर दिवसागणिक अधिक वाढू लागली आहे.

अनेकांनी सध्या ग्रीन टीचा पर्याय हा स्विकारला आहे. ग्रीन टीमुळे शरीरातील जळजळ कमी होते. तसेच आपल्या मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर मानली जाते. ताण कमी करायचा असेल आणि दिवसभर हलके वाटायचे असेल तर ग्रीन टी हा एक चांगला पर्याय आहे.

तुमच्या जीवनशैली, वैद्यकीय स्थिती तसेच शरीराच्या स्वरूप आणि गरजेनुसार तुमच्या आहारात काहीही समाविष्ट करावे. तेही मर्यादित प्रमाणात, अन्यथा ते तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते.

ब्लॅक कॉफी आणि ग्रीन टी दोन्हीचे स्वतःचे फायदे आहेत, परंतु कोणते चांगले आहे हे तुमच्या आरोग्यावर, गरजांवर आणि जीवनशैलीवर अवलंबून असते.

ब्लॅक कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते, जे शरीराला त्वरित ऊर्जा देते आणि ते सतर्क ठेवण्यास मदत करते. यासोबतच, ते चयापचय वाढवण्यास मदत करते.

ब्लॅक काॅफी टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. पण जास्त कॅफिन सेवन केल्याने निद्रानाश, आम्लता आणि रक्तदाब वाढणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

 ग्रीन टीमध्ये कॅफिन कमी असते आणि ते अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास, वजन कमी करण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल