Ratnagiri Fort – घेरा यशवंत गडाच्या नवीन बांधकामाची पडझड, ग्रामस्थ संतापले; पुरातत्व विभागाकडून पाहणी

Ratnagiri Fort – घेरा यशवंत गडाच्या नवीन बांधकामाची पडझड, ग्रामस्थ संतापले; पुरातत्व विभागाकडून पाहणी

राजापूर तालुक्यातील साखरी नाटे-नाटे भागात असलेल्या ऐतिहासिक घेरा यशवंतगडावरील नवीन बांधकामाची पडझड झाल्याने खळबळ उडाली होती. पडझड झालेल्या कामाची रत्नागिरीतील पुरातत्व विभागाच्या अभियंत्यांनी शुक्रवारी (6 जून 2025) पाहणी केली. घेरा यशवंत गडाच्या नवीन कामाची पडझड झाली. या घटनेमुळे साखरी नाटे, नाटे तसेच आजूबाजूच्या गावांमधील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली.

यावेळी पुरातत्व विभागाचे अभियंता विशाल भरसट यांनी पडझड झालेल्या कामाची तसेच उर्वरित किल्ल्याच्या कामाची सविस्तर पाहणी करून आढावा घेतला. या संदर्भातला सविस्तर अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात येईल असे यावेळी त्यांनी सांगितले. या पाहणी दौऱ्यावेळी नाटे सरपंच संदीप बांदकर, ग्रामपंचायत सदस्य निलेश बांदकर, शिवप्रेमी शरद घरकर, साखरी नाटे ग्रामपंचायत सदस्य मजीद सायेकर, पिंट्या कोठारकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळा कुबडे, संतोष चव्हाण, देवेंद्र बांदकर, प्रसाद मोदी, सुवर्णा बांदकर, मनाली करंजवकर, सचिन बांदकर, सिद्धेश मराठे आदी ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, शिवप्रेमी उपस्थित होते.

घेरा यशवंतगडाचे नवीन बांधकाम कोसळल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. या कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्याचबरोबर आजूबाजूचे चिरेबंदी बांधकामही कोसळण्याच्या अवस्थेत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

साईबाबांवरील वक्तव्याचा वाद चिघळला; शिर्डी ग्रामस्थ आक्रमक, अरुण गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल साईबाबांवरील वक्तव्याचा वाद चिघळला; शिर्डी ग्रामस्थ आक्रमक, अरुण गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
श्री साईबाबांनी त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांच्या भक्त, सेविका लक्ष्मीबाई शिंदे यांना दिलेली चांदीची नऊ नाणी नेमकी कोणाकडे आहेत, यावरून निर्माण...
शनिभक्तांची फसवणूक करून दोन कर्मचारी झाले करोडपती; शनी शिंगणापूर बनावट अॅप प्रकरण
शेअर ट्रेडिंगमध्ये 40 लाखांची फसवणूक; गुजरातमधील चार आरोपींना अटक
उजनीतून विसर्ग घटला; पंढरीतील पुराचे संकट टळले
सोलापूर विद्यापीठाचा मंगल शहा यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर
सांगली जिल्हा बँकेची कारवाई; 2.11 कोटींचा अपहार, सात कर्मचारी बडतर्फ
बनावट कागदपत्रांनी 44 लाखांची फसवणूक; कोल्हापुरात 25 जणांविरुद्ध गुन्हा