Sweet Dish- अवघ्या दहा मिनिटांमध्ये बनवा घरीच्या घरी साॅफ्ट गुलाबजाम

Sweet Dish- अवघ्या दहा मिनिटांमध्ये बनवा घरीच्या घरी साॅफ्ट गुलाबजाम

घरी पाहुणे येणार म्हटल्यावर गोडा धोडाचे पदार्थ करणं हे ओघानं येतंच. परंतु घाईच्या वेळी काय करायचं असा प्रश्न पडला असेल तर, ब्रेडचे हे साधे सोपे आणि चवीला उत्कृष्ट लागणारे गुलाबजाम नक्की करुन बघा. हे गुलाबजाम दिसायला जितके सुंदर दिसतात त्यापेक्षा जास्त चवीला उत्तम लागतील असेच आहेत. त्यामुळे आता घाईच्या वेळी पटकन एक ब्रेड घेऊन या आणि झटपट हे ब्रेडचे गुलाबजाम बनवून बघा. घरातील सर्वांना तर आवडतीलच, पाहुणेही खाऊन तुमचं कौतुक करतील हे नक्की..

ब्रेड गुलाबजाम 

साहित्य
10 तुकडे ब्रेड
2 कप दूध
2 चमचा वेलची पावडर
2 वेलची
2 कप पाणी
2 कप साखर
गरजेनुसार तूप किंवा तेल

कृती

सर्वात आधी ब्रेडच्या कडा नीट कापून घ्या. ब्रेडला अजिबात कडा राहता कामा नये.

 

कडा काढून झालेला ब्रेड हा दुधात भिजवून ठेवा. किमान दहा ते पंधरा मिनिटे हा ब्रेड दुधात भिजवून ठेवावा.

 

हा ब्रेड दुधात भिजल्यानंतर यामध्ये थोडेसे तेल वेलची पावडर घालून मळून घ्यावा. ब्रेड मळताना तो अतिशय हलक्या हाताने मळून घ्या.

 

ब्रेड मळाल तेव्हा हे लक्षात असू द्या की, ब्रेडचे केलेले मिश्रण हे फार कडक किंवा फार मऊ नसावे.

ब्रेडचे हे मिश्रण किमान 10 मिनिटे झाकून ठेवावे.

त्यानंतर याचे गुलाबजामच्या आकाराचे गोळे करुन घ्यावे.

पॅनमध्ये तूप किंवा तेल गरम करुन, त्यात दोन्ही बाजूंनी लाल होईपर्यंत गोळे तळून घ्यावेत.

 

 

दुसऱ्या एका पॅनमध्ये साखर आणि पाणी घालून एक सिरप बनवावे. त्यात वेलची आणि केशराच्या दांड्या घालाव्यात. म्हणजे साखरेच्या पाकाला चांगला सुगंध येईल. केशराने साखरेच्या पाकाला मस्त रंगही येतो.

साखरेचा पाक किंचित थंड झाल्यानंतर त्यात गुलाबजाम सोडावेत. त्यानंतर गुलाबजाम मुरल्यानंतर बाहेर काढून ठेवावे.

 

 

 

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;