Tesla India जुलैमध्ये सुरू होणार टेस्लाचं मुंबईतील पहिलं शोरूम

Tesla India जुलैमध्ये सुरू होणार टेस्लाचं मुंबईतील पहिलं शोरूम

अमेरिकेचे उद्योगपती आणि टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांच्या इलेक्ट्रिक कारचे हिंदुस्थानातील पहिले शोरूम मुंबईतील BKC येथे सुरू होणार आहे. हे शो रूम जुलैच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सुरू होऊ शकते. टेस्ला कंपनी या शोरूमसाठी दर महिना 35 लाख रुपये एवढे भाडे मोजणार आहे.

मुंबईतील शोरुमसाठी टेस्लाची वाय रिअर व्हिल ड्राईव्ह एसयूव्ही गाड्या मुंबईत दाखल झाल्या आहेत. हे टेस्लाचे जगातील सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल आहे. या कारची चीनच्या शांघायमधील कारखान्यात निर्मिती झाली असून तिथून ती मुंबईत पाठवण्यात आली. ब्लूमबर्गने याबाबत वृत्त दिले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;