व्हॉट अन् आयडिया! मुंबईतला रिक्षाचालक महिन्याला कमावतो 5 लाख

व्हॉट अन् आयडिया! मुंबईतला रिक्षाचालक महिन्याला कमावतो 5 लाख

मुंबईतील रिक्षाचालक हटके काम करून दिवसाला 20 ते 30 हजार रुपये तर महिन्याला पाच ते आठ लाख रुपये कमावतो. त्याच्याकडे अॅप नाही किंवा तो ड्रायव्हिंगही करत नाही. रिक्षाचालक रिक्षा न चालवता एवढे पैसे कसे कमावतो, असा सवाल उपस्थित होतो. रिक्षाचालक स्मार्ट बिझनेस करतो. तो त्याच्या रिक्षाचा वापर एखाद्या लॉकरसारखा करतो.

याबाबत लिंक्डइनवर उद्योजक राहुल पिपाणी यांनी पोस्ट शेअर करून माहिती दिली. संबंधित रिक्षाचालक अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाबाहेर त्याची रिक्षा लावतो. तिथे व्हिसा अपॉइंटमेंटसाठी येणाऱ्या लोकांना तो मदत करतो. सुरक्षा नियमांनुसार वाणिज्य दूतावासाच्या आवारात बॅगा आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाण्यास मनाई आहे. दूतावासाच्या आत लॉकरची व्यवस्था नाही. लोकांची हीच समस्या लक्षात घेऊन या रिक्षाचालकाने वाणिज्य दूतावासाबाहेर रिक्षा उभी केली आणि या कार्यालयात येणाऱ्यांच्या बॅगा सांभाळण्याचे काम सुरू केले. या बॅगा सांभाळण्याकरता प्रत्येकाकडून हजार रुपये घेतले जातात. दिवसाला जवळपास 20 ते 30 ग्राहकांनी त्याच्याकडे बॅगा ठेवल्या तरी रिक्षाचालक 20 ते 30 हजार रुपये कमावतो. म्हणजेच महिन्याला तब्बल 5 ते 8 लाख रुपये कमावतो.

ही पोस्ट करताना रुपाणी यांनी या कल्पनेला स्मार्ट बिझनेस असे म्हटले. ऍप्स, निधी किंवा बिझनेस डिग्रीशिवाय हे साध्य केल्याने रुपाणी यांनी त्याचे कौतुक केले. नियमानुसार रिक्षामध्ये एकाकेळी जास्त बॅगा ठेकू शकत नाही. म्हणून रिक्षाचालकाने भागीदारीत एक छोटी लॉकर जागा मिळकली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;