प्रत्येक मुलाने इंग्रजी बोलली पाहिजे, त्यात लाज कसली! राहुल गांधी यांचे अमित शहांना प्रत्युत्तर

प्रत्येक मुलाने इंग्रजी बोलली पाहिजे, त्यात लाज कसली! राहुल गांधी यांचे अमित शहांना प्रत्युत्तर

‘‘देशातील जे लोक इंग्रजी बोलतात त्यांना लवकरच त्याची लाज वाटेल,’’ असे वक्तव्य पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्याला आज जोरदार प्रत्युत्तर दिले. इंग्रजी भाषा आपल्याला सशक्त बनवते. त्यामुळे इंग्रजी बोलण्यात लाज कसली. प्रत्येक मुलाने इंग्रजी शिकायला हवे, असे स्पष्ट मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले.

राहुल गांधी यांनी एक्सवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. ‘‘इंग्रजी हा बांध नाही, एक पूल आहे. इंग्रजी ही लाज नाही, ती शक्ती आहे. इंग्रजी ही साखळी नाही, ती साखळय़ा तोडण्याचे एक साधन आहे. आजच्या जगात इंग्रजी ही तुमच्या मातृभाषेइतकीच महत्त्वाची आहे. कारण ती रोजगार देईल आणि आत्मविश्वास वाढवेल. मात्र भाजप-आरएसएस यांना देशातील गरीब मुलांनी इंग्रजी शिकावे, प्रश्न विचारावे, समान व्हावे असे वाटत नसल्याने ते इंग्रजी शिपू नये अशी भूमिका घेत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;