आता आपल्याला 15 लाखांऐवजी 45 लाख मिळणार? अंजली दमानिया यांची पंतप्रधान मोदींवर खोचक टीका

आता आपल्याला 15 लाखांऐवजी 45 लाख मिळणार? अंजली दमानिया यांची पंतप्रधान मोदींवर खोचक टीका

विदेशातील काळा पैसा परत आणण्याची घोषणा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आले होते. निवडणूक प्रचारावेळी मोदींनी हा काळा परत आणून प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकण्याची घोषणा केली. पण सत्तेवर आल्यावर ना काळा पैसा परत आला, ना प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख आले. उलट हिंदुस्थानी व्यक्तींचा स्विस बँकेतील पैसा तिपटीने वाढल्याचे समोर आले आहे. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.

अंजली दमानिया यांनी आपल्या एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवर एका इंग्रजी वेबसाईटची बातमी शेअर केली आहे. यात हिंदुस्थानी व्यक्तींनी स्विस बँकेमध्ये ठेवलेला पैसा 2024 मध्ये तिपटीने वाढल्याचे समोर आले आहे. यावरून दमानिया यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींचे आणखी एक आश्वासन खोटे ठरल्याचे त्या म्हणाल्या. तसेच स्विस बँकेतील पैसा तिपटीने वाढल्याने आता आपल्याला 15 लाखांऐवजी 45 लाख मिळणार? असा सवालही त्यांनी केला.

दरम्यान, 2024 मध्ये स्विस बँकेतील हिंदुस्थानी व्यक्तींचा पैसा तिप्पट वाढून 3.5 अब्ज स्वीस फ्रँक (जवळपास 37 हजार 600 कोटी रुपये) झाला आहे. स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकेने गुरुवारी जाहीर केलेल्या वार्षिक आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

मोदींचा आणखी एक जुमला! परदेशातील काळा पैसा आलाच नाही, स्वीस बँकेतील हिंदुस्थानींचा पैसा तिपटीने वाढला

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;