इराणने खुली केली एअरस्पेस, 1000 हिंदुस्थानी नागरिकांना चार्टर्ड विमानांनी दिल्लीला पाठवणार

इराणने खुली केली एअरस्पेस, 1000 हिंदुस्थानी नागरिकांना चार्टर्ड विमानांनी दिल्लीला पाठवणार

इराण आणि इस्रायलमधील युद्धाने भयंकर रुप घेतले आहे. दोन्ही देश एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले करत आहेत. या हल्ल्यात सामान्य नागरिकांचा नाहक बळी जात आहे. देशातील युद्धजन्य परिस्थिती पाहता इराणमधून आपल्या देशात परतण्याची इच्छा असणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांसाठी इराणने चार्टर्ड विमानांची व्यवस्था केली आहे.

इस्रायलशी सुरू असलेल्या युद्धामुळे इराणने आपली हवाई हद्द बंद केली आहे. मात्र हिंदुस्थानी नागरिकांना देशाबाहेर जाण्यासाठी इराणने आपली हवाई हद्द खुली केली आहे. इराणमधील सुमारे 1000 हिंदुस्थानी नागरिकांना नवी दिल्ली येथे पाठवणार आहे. इराणमधून दिल्लीला हिंदुस्थानी नागरिकांना आणण्यासाठी मशहादहून हवाई चार्टर्ड विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे. आज रात्री हिंदुस्थानी नागरिक इराणहून नवी दिल्लीला पोहोचतील, असे इराणच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रादेशिक तणावाच्या काळात इराण हिंदुस्थानी नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करू इच्छित असल्याचेही अधिकाऱ्यांनी नमूद केले.

हिंदुस्थानच्या सरकारने दोन दिवसांपूर्वी ‘ऑपरेशन सिंधू’ सुरू केले आहे. या कारवाईअंतर्गत इराणमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना त्यांच्या मायदेशी परतण्यास मदत करत आहे. ही कारवाई सुरू केल्यानंतर इराणने हिंदुस्थानी नागरिकांसाठी चार्टर्ड विमानांची व्यवस्था केली.

दरम्यान, इस्रायलकडून होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध करण्याचे आवाहन इराणने हिंदुस्थानला केले आहे. जर हिंदुस्थानने असे केले नाही तर ते हल्लेखोरांना प्रोत्साहन दिल्यासारखे होईल, असे इराणने म्हटले आहे. इस्रायल स्वतःला बळी म्हणवून हल्लेखोराची भूमिका बजावतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य? केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य?
केळं हे एक असं फळ आहे जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. मऊसर, गोडसर आणि ऊर्जा देणारं हे फळ नाश्त्यासाठी आदर्श...
महायुतीच्या काळात कर्जात वाढ, जनतेच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी सरकारने काढला पळ; अंबादास दानवेंची टीका
Chhattisgarh News – नारायणपूरमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार
Mumbai News – बँकॉकहून मुंबईत गांजा तस्करी प्रकरणी मुंबई विमानतळावर प्रवाशाला अटक, सीमाशुल्क विभागाची कारवाई
Photo – सई… बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल
महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, दुकानं नाही शाळाही बंद करेन; राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणावी, युवा पिढीचं भविष्य अंधारात घालायचे पाप करू नका – कैलास पाटील