Weight Loss Recipe – लहानांसह मोठ्यांना आवडेल असा सकस नाचणीचा उपमा, वजन कमी करण्यासाठी सर्वात उपयुक्त

Weight Loss Recipe – लहानांसह मोठ्यांना आवडेल असा सकस नाचणीचा उपमा, वजन कमी करण्यासाठी सर्वात उपयुक्त

आपल्या आहारात नाचणी हे धान्य खूप महत्त्वाचं मानलं जातं. नाचणीच्या समावेशामुळे आपली हाडे मजबूत होतात. तसेच नाचणीमध्ये असलेल्या फायबरमुळे निरोगी राहण्यासाठी खूप गरजेचे मानले जाते. लहानांसह मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी नाचणी ही सर्वोत्तम मानली जाते. नाचणीमुळे अॅनिमियासारखे आजार हे दूर राहण्यास मदत मिळते. तसेच नाचणीमुळे ग्लायसेमिक इंडेक्समध्येही मोठ्या प्रमाणात कमी होतो.

नाचणीच्या सेवनाने शरीर निरोगी आणि सुदृढ ठेवण्यास मदत होते. तसेच शरीरातील रक्तवाढीस मदत होते, आणि मेंदूचा विकासही चांगला होतो. शिवाय त्वचा तुकतुकीत ठेवण्यासही नाचणी बहुमोली ठरते.

नाचणीचा उपमा हा एक पौष्टिक पदार्थ आहे. मुलांच्या डब्याला द्यायला ही उत्तम रेसिपी आहे. तसेच वजन कमी करणाऱ्यांसाठी सुद्धा नाचणी उपमा हा एक उत्कृष्ट पर्याय मानला जातो. बहुगुणी नाचणीसोबत मूग, मेथी, गाजर अशा पौष्टिक घटकांपासून बनवलेला हा उपमा ही मुलांच्या डब्यासाठी एक चविष्ट आणि सोपी अशी रेसिपी आहे.

नाचणी उपमा

साहित्य :
एक वाटी नाचणी
मेथीचे दाणे
मोड आलेले मूग
किसलेले गाजर
बारीक चिरलेला 1 टोमॅटो
आले-लसूण पेस्ट 1 चमचा
मीठ पाऊण चमचा
हिंग
मोहरी
तेल 2 चमचे
जिरे
हळद
कढीपत्ता
कोथिंबीर
लिंबाचा रस

कृती :

सर्वप्रथम नाचणी किमान रात्रभर भिजवून ठेवावी. नाचणी पाण्यातून काढून नंतर थोडीशी वाफवून घ्यावी.

तेल गरम करुन नंतर त्यात फोडणी करून कढीपत्ता घालावा. त्यानंतर आले-लसूण पेस्ट घालावी.

नंतर त्यामध्ये किसलेला गाजर, चिरलेला टोमॅटो, मूग आणि मेथीदाणे घालून हे सर्व एकत्रित पाच मिनिटे शिजू द्यावे.

पुरेशी वाफ आल्यानंतर या मिश्रणात भिजवलेली नाचणी घालावी.

त्यावर मीठ आणि लिंबूरस घालून ते एकदा एकत्रित हलवून घ्यावे.

पुन्हा दोन मिनिटे त्यावर झाकण ठेऊन वाफ येऊ द्यावी.

गरम गरम उपम्यावर कोथिंबीर आणि शेव घालून तो सर्व्ह करावा.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;