लोकल ट्रेनमधून पडून दररोज 10 लोक मरताहेत हे चिंताजनक; हायकोर्टाची टिप्पणी

लोकल ट्रेनमधून पडून दररोज 10 लोक मरताहेत हे चिंताजनक; हायकोर्टाची टिप्पणी

मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनमधून प्रवासी खाली पडण्याचे प्रमाण गंभीर आहे. लोकल ट्रेनमधून पडून दररोज 10 लोक मरताहेत हे चिंताजनक असल्याचे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी रेल्वेचा समाचार घेतला. उच्च न्यायालयाने मुंब्रा येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर तीव्र चिंता व्यक्त करत अपघाताचे सत्र रोखण्यासाठी लोकल ट्रेनला लवकरात लवकर स्वयंचलित दरवाजे बसवण्याची सूचनाही यावेळी केली. उपाययोजनांची अंमलबजावणी होते की नाही यावर न्यायालय देखरेख ठेवेल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

9 जून रोजी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या गेटवरील 13 प्रवासी खाली पडले. दुर्घटनेत चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. उपनगरीय रेल्वे मार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर याआधीच जनहित याचिका दाखल झाली आहे. त्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने मुंब्रा येथील अपघाताच्या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली. रेल्वे प्रशासनाला लोकल ट्रेनला लवकरात लवकर स्वयंचलित दरवाजे बसवण्याची सूचना न्यायालयाने केली.

धावत्या गाड्यांमधून पडून लोक मरत आहेत. दररोज सुमारे 10 प्रवासी अपघातात मरतात. तुमच्या स्वतःच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे. यावरून तुम्ही जे काही उपाय केले आहेत ते पुरेसे नाहीत, असे दिसते. ही परिस्थिती चिंताजनक आहे, अशी टिप्पणी न्यायमूर्ती मारणे यांनी केली.

वेळोवेळी प्रतिबंधात्मक पावले उचलण्यात आली आहेत आणि ९ जूनच्या घटनेनंतर वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे, असे रेल्वेकडून बाजू मांडताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी सांगितले. तसेच विविध उपाययोजनांकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. मात्र खंडपीठाने त्यावर असमाधान व्यक्त करत लवकरात लवकर लोकल ट्रेनना स्वयंचलित दरवाजे बसवण्याची सूचना केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल