निवडणुकीचे CCTV फुटेज 45 दिवसच ठेवणार, ‘दुरुपयोग’ होण्याची आयोगाला भीती!

निवडणुकीचे CCTV फुटेज 45 दिवसच ठेवणार, ‘दुरुपयोग’ होण्याची आयोगाला भीती!

केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणुकीवेळी रेकॉर्ड काढले जाणारे फोटो आणि रेकॉर्ड केलेले व्हिडिओ फुटेजच्या नियमात बदल केला आहे. निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज यापुढे फक्त 45 दिवसच सुरक्षित ठेवले जाणार आहेत, असे निवडणूक आयागने म्हटले आहे.

निवडणुकीचे व्हिडिओ फुटेज आणि फोटे सुरक्षित ठेवण्याचे नियम निवडणूक आयोगाने बदलले आहेत. आता सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचा कालावधी 45 दिवसांपर्यंत कमी करण्यात आला आहे. याचा अर्थ असा की निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत सीसीटीव्ही डेटा निवडणूक आयोगाकडे सुरक्षित राहील. या वेळेपर्यंत निवडणूक आयोगाकडे कोणतीही याचिका किंवा तक्रार पोहोचली नाही तर, तो डेटा नष्ट केला जाऊ शकतो. यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारच्या रेकॉर्डिंग्ज निवडणूक आयोगाकडून 3 महिने ते 1 वर्षासाठी सुरक्षित ठेवल्या जात होत्या.

मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद जास्त…; BMC निवडणुकीवर शरद पवार यांचं मोठं विधान

निवडणूक आयोगाने या निर्णयाची माहिती सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना दिली आहे. अलिकडेच झालेल्या दुरुपयोगाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, असे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. कायद्यानुसार निवडणूक प्रक्रियेची व्हिडिओग्राफी आणि फोटो काढणे अनिवार्य नाही. मात्र, त्याचा ‘इंटर्नल मॅनेजमेंट टूल’ म्हणून उपयोग केला जाते, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

सोशल मीडियावर चुकीची माहिती आणि द्वेषपूर्ण भाषण पसरवण्यासाठी या कंटेंटचा अलिकडेच दुरुपयोग करण्यात आला आहे. हे काम अशा लोकांनी केले आहे जे निवडणुकीत प्रतिस्पर्धीही नव्हते. अशा कंटेंटचा वापर बाहेरून करण्यात आला आहे. ज्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही. म्हणूनच समीक्षा करण्यात आली, असे निवडणूक आयोगाने राज्यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना दिलेल्या निर्देशांमध्ये स्पष्ट केले आहे.

असमानता संपेपर्यंत कोणताही देश लोकशाहीवादी नाही, सरन्यायाधीश भूषण गवई यांचे परखड मत

काय झाला बदल?

यापूर्वी निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल होण्यापूर्वीचे फुटेज हे 3 महिन्यांपर्यंत सुरक्षित ठेवले जात होते. तर उमेदवारी, प्रचार, मतदान (मतदान केंद्राच्या आतील आणि बाहेरील) आणि मतदानचे रेकॉर्डींग मतदानाच्या टप्प्यांच्या आधारावर 6 ते 1 वर्षापर्यंत सुरक्षित ठेवण्याचा नियम होता. आता तो फक्त 45 दिवसांवर करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;