IND Vs ENG 1st Test – दोन्ही संघांचे खेळाडू काळीपट्टी बांधून मैदानात उतरले, कारण काय?

IND Vs ENG 1st Test – दोन्ही संघांचे खेळाडू काळीपट्टी बांधून मैदानात उतरले, कारण काय?

इंग्लंडमधील हेंडिग्ले येथील लीड्सच्या मैदानावर टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला शुक्रवारपासून (20 जून 2025) सुरुवात झाली. इंग्लंडने नाणेफेक जिंकत टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी दोन्ही संघ जेव्हा मैदानात उतरले, तेव्हा दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या दंडावर काळीपट्टी बांधण्यात आली होती.

हिंदुस्थानातून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा 12 जून रोजी अहमदाबादमध्ये उड्डान घेतल्यानंतर अवघ्या 30 सेकंदात भयंकर अपघात झाला होता. या अपघातात 290 हून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. पहिल्या कसोटी सामन्यात या दुर्दैवी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन्ही संघांचे खेळाडू दंडावर काळीपट्टी बांधून मैदानात उतरले. नाणेफेक झाल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू राष्ट्रगीतासाठी मैदानात आले, तेव्हा दोन्ही संघांच्या खेळाडूंनी अहमदाबाद अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिली तसेच एक मिनिटांच मौन सुद्धा पाळलं.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;