आषाढी वारीच्याआधी तरुण वारकऱ्याचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू

आषाढी वारीच्याआधी तरुण वारकऱ्याचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू

चंद्रभागा नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने शुभम ज्ञानेश्वर पावले (वय 27, रा. बेळगाव) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी पहाटे सहाच्या सुमारास घडली. शुभम व त्याचे नातेवाईक श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. दर्शनापूर्वी चंद्रभागा नदीचे स्नान करण्यासाठी हे सर्व कुटुंब भक्त पुंडलिक मंदिराजवळ गेले.

पहाटेच्या अंधुक प्रकाशात शुभमने चंद्रभागा नदीत उडी घेतली. पाण्याचा वाढता प्रवाह आणि पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्याने, शुभम पाण्यात वाहून गेला. नदीवर फारशी गर्दी नसल्याने शुभम बुडतोय हे कोणाच्याही लक्षात आले नाही. बराच वेळ झाला अंघोळीला गेलला शुभम कसा आला नाही म्हणून शोध घेतला असता सकाळी 11 वाजता शुभमचा पात्रामध्ये आढळून आला. शुभमच्या अनपेक्षित दुर्घटनेमुळे त्याच्या कुटुंबाला दुःख अनावर झाले.

वाळू चोरीमुळे चंद्रभागा पात्रात मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक भाविकांना आपला जीव गमवावा लागत आहे. वाळू चोरी रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;