बिनशर्त माघार घ्यायला लावू! इराणचा इस्रायलला इशारा

बिनशर्त माघार घ्यायला लावू! इराणचा इस्रायलला इशारा

इराण-इस्रायलमधील युद्धाची तीव्रता दिवसागणिक वाढत असून दोन्ही देश अक्षरशः इरेला पेटले आहेत. इस्रायलची तळी उचलून इराणला दमदाटी करणाऱ्या अमेरिकेच्या धमक्यांची इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी हवा काढून टाकली आहे. ‘‘आम्ही शरण जाणार नाहीच, उलट इस्रायलला बिनशर्त माघार घ्यायला लावू,’’ असे ठणकावत खामेनी यांनी अमेरिकेला नडण्याचा आणि इस्रायलविरुद्ध लढण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे.

इराण-इस्रायलमध्ये युद्ध पेटल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकावणे सुरू केले होते. ‘‘इराणच्या आकाशावर आम्ही पूर्ण ताबा मिळवला असून खामेनी कुठे लपून बसले आहेत हेही आम्हाला माहीत आहे. त्यांना आम्ही सहज संपवू शकतो. मात्र इराणने बिनशर्त माघार घेतल्यास आम्ही खामेनी यांना जीवदान देऊ,’’ असे ट्रम्प म्हणाले होते. ट्रम्प यांच्या या इशाऱ्याला इराणचे 86 वर्षीय नेते खामेनी यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे. सध्या भूमिगत असलेल्या खामेनी यांनी एक व्हिडीओ जारी करून ट्रम्प यांना सुनावले आहे. इस्रायल विरोधात इराणमध्ये जनता रस्त्यावर उतरली आहे. देशभरात उग्र निदर्शने सुरू आहेत.

…तोपर्यंत अमेरिकेशी वाटाघाटी नाही!

‘‘इस्रायलने इराणच्या विरोधात सुरू केलेले युद्ध ही गुन्हेगारी कारवाई असून यात अमेरिकाही भागीदार आहे. अमेरिका आता आमच्याशी वाटाघाटीचे प्रयत्न करत आहे, पण इस्रायल जोवर इराणवरील हल्ले थांबवत नाही, तोवर वाटाघाटींचा प्रश्नच उद्भवत नाही,’’ असे इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले आहे.

जेरूसलेम, तेल अवीववर हल्ले; मायक्रोसॉफ्ट कार्यालयही लक्ष्य

शेअर बाजारच्या इमारतीला लक्ष्य करून इस्रायलला जोरदार दणका दिल्यानंतर इराणने क्षेपणास्त्र हल्ले सुरूच ठेवले आहेत. शुक्रवारी इराणने केलेल्या हल्ल्यात इस्रायलमधील मायक्रोसॉफ्टचे कार्यालय थोडक्यात वाचले. मायक्रोसॉफ्टचे कार्यालय असलेल्या टेक पार्कजवळ इराणने क्षेपणास्त्र डागले.

इराणमध्ये अडकलेले एक हजार भारतीय परतणार

इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणमध्ये अडकलेल्या व सध्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या सुमारे एक हजार भारतीय नागरिकांना आणण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंधूर’ सुरू केले आहे. त्यास प्रतिसाद देत इराणने भारतीय विमानांसाठी आपले आकाश खुले केले आहे. त्यानुसार सुरुवातीला तीन चार्टर्ड विमाने इराणला जाणार आहेत.

  • इस्रायलने इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केल्यास चेर्नोबिलसारखे संकट ओढवेल – रशियाचा इशारा
  • इराणशी अणुसहकार्य सुरू ठेवण्यावर रशिया ठाम
  • संयुक्त राष्ट्रसंघाचे इराण-इस्रायलला शांततेचे आवाहन
  • स्वीत्झर्लंडचा इराणमधील दूतावास बंद
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य? केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य?
केळं हे एक असं फळ आहे जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. मऊसर, गोडसर आणि ऊर्जा देणारं हे फळ नाश्त्यासाठी आदर्श...
महायुतीच्या काळात कर्जात वाढ, जनतेच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी सरकारने काढला पळ; अंबादास दानवेंची टीका
Chhattisgarh News – नारायणपूरमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार
Mumbai News – बँकॉकहून मुंबईत गांजा तस्करी प्रकरणी मुंबई विमानतळावर प्रवाशाला अटक, सीमाशुल्क विभागाची कारवाई
Photo – सई… बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल
महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, दुकानं नाही शाळाही बंद करेन; राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणावी, युवा पिढीचं भविष्य अंधारात घालायचे पाप करू नका – कैलास पाटील