‘बीकेसी’च्या ‘सेबी’ कार्यालयात साप आणि अजगरांचा सुळसुळाट, एकाच ठिकाणी आढळली बारा पिल्ले

‘बीकेसी’च्या ‘सेबी’ कार्यालयात साप आणि अजगरांचा सुळसुळाट, एकाच ठिकाणी आढळली बारा पिल्ले

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सध्या सापांचा सुळसुळाट सुरू असून आज सेबीच्या कार्यालयात अजगराची तब्बल 12 पिल्ले आढळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नोकरदारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी कर्मचारी वर्गातून केली जात आहे.

बीकेसीमध्ये सेबी भवनात रस्त्याच्या कडेला ही अजगराची पिल्ले आढळली. यावेळी सर्पमित्र अशोक कांबळे, सचिन मोरे यांनी घटनास्थळी दाखल होत अजगराच्या पिल्लांची सुटका करून नैसर्गिक सान्निध्यात सोडून देण्यात आले. तर एक पिल्लू गाडीखाली चिरडून मृत पावल्याचेही समोर आले. या परिसरात इतक्या मोठय़ा प्रमाणात अजगराची पिल्ले आढळत असल्याने रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

– नागरिकांनी प्रशिक्षण नसताना कोणत्याही सापाला पडकण्यासाठी जाऊ नये आणि साप आढळल्यास सर्पमित्राशी संपर्क करावा, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;