आम्ही दोघे बहीण-भाऊ; आमच्यावर शंका घेऊ नका! सोलापुरात तरुण-तरुणीनं एकाच ओढणीनं घेतला गळफास

आम्ही दोघे बहीण-भाऊ; आमच्यावर शंका घेऊ नका! सोलापुरात तरुण-तरुणीनं एकाच ओढणीनं घेतला गळफास

सोलापुरातून एक धक्कादायक बातमी येत आहे. शहरातील कर्णिक नगर भागात वाहन चालक असलेल्या तरुणीने आणि महाविद्यालयातील तरुणीने एकाच ओढणीने गळफास घेत जीवन संपवले. गुरुवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. रोहित भिमाशंकर ठणकेदार (वय – 24, रा. भवानी पेठ, मड्डी वस्ती, सोलापूर) आणि अश्विनी विरेश केशापुरे (वय – 23) अशी मृतांची नावे आहेत. दोघांनी एकत्र आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र आत्महत्येपूर्वी त्यांनी दोन पानांची सुसाईड नोट लिहिली असून यात त्यांनी आपल्या नात्याचा उल्लेख केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्णिक नगर भागातील घराच्या पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये असलेल्या छताला दोघांनी गळफास घेतला. छताला असलेल्या लोखंडी रॉडला ओढणी बांधून दोघांनीही एकत्र जीवन संपवले. याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही शासकिय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी एक दोन पानांची सुसाईड नोटही सापडली आहे. यात त्यांनी आम्ही आम्ही दोघे बहीण-भाऊन असून आत्महत्येनंतर आमच्यावर शंका घेऊ नका, असे लिहिलेले आहे. दुसरीकडे मयत रोहितच्या कुटुंबियांनी मात्र आपल्याला अश्विनीबद्दल काही माहिती नसल्याचे म्हटल्याने या आत्महत्येबाबत गूढ निर्माण झाले आहे.

रोहित ठणकेदार हा वाहन चालक असून गेल्या 15 दिवसांपासून तो घरी आला नव्हता. तर अश्विनी केशापुरे ही कर्नाटकातील एका महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होती. दोनच दिवसांपूर्वी ती सोलापुरात आली होती. गुरुवारी सायंकाळी ती कॉलेजला कर्नाटकात जाते म्हणून घरातून निघाली. तिच्या आई-वडिलांनीही तिला घरापासून रेल्वे स्थानकापर्यंत रिक्षा करून दिली. पण ती कर्नाटकात पोहोचलीच नाही. ती कुणाचा फोन कॉलही घेत नव्हती. आता दोघांनीही आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, अश्विनीच्या काकांनी माहिती देताना सांगितले की, रोहित तिला सात-आठ दिवसांनी भेटायला येत होता. त्याच्याबाबत विचारले असता तिने हा आपला मानलेला भाऊ असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आम्ही दोघांमध्ये कधी पडलो नाही. ही घटना घडली त्याच्या तीन दिवस आधीही रोहित तिला भेटायला आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे नक्की प्रकरण काय हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;