ऐकावे ते नवलच! मोदींनी घरात लावले सिंदूरचे रोपटे
पाकिस्तानच्या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू करून स्वतःची पाठ थोपटून घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी घरात सिंदूरचे रोपटे लावले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून त्यांनी हे रोपटे लावल्याचा पह्टो सोशल मीडियात शेअर केला. हे रोपटे नारीशक्तीच्या शौर्य व प्रेरणेचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले.
1971 च्या युद्धात शूर कामगिरी केलेल्या रणरागिणींनी पंतप्रधान मोदींना गुजरात दौऱयावेळी सिंदूरचे रोपटे भेट दिले होते. ते रोपटे पंतप्रधान निवासामध्ये लावण्याचे सैभाग्य मला लाभले, अशी भावना मोदींनी व्यक्त केली. मोदी अलीकडेच गुजरातच्या कच्छ भागात गेले होते. तेथे 1971 च्या युद्धातील रणराणिगिनी महिलांनी मोदींची भेट घेतली होती. त्या भेटीवेळी रणरागिणींनी मोदींना सिंदूरचे रोपटे दिले होते. हे रोपटे नारीशक्तीच्या शौर्य आणि प्रेरणेचे सशक्त प्रतीक आहे, असे नमूद करीत मोदींनी सिंदूर रोपटे लागवडीची छायाचित्रे सोशल मीडियात पोस्ट केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List