संततधार पावसाने उद्योगनगरी जलमय; वाहतूक संथ, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ, मोरया गोसावी मंदिरात पाणी शिरले

संततधार पावसाने उद्योगनगरी जलमय; वाहतूक संथ, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ, मोरया गोसावी मंदिरात पाणी शिरले

पिंपरी-चिंचवड शहरात मध्यरात्रीपासून गुरुवारी दुपारपर्यंत संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सकाळपासून पावसाने शहरात जोर धरला. त्यामुळे संपूर्ण उद्योगनगरी जलमय झाल्याचे पाहायला मिळाले. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पवना व इंद्रायणी नद्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. चिंचवडगावातील मोरया गोसावी समाधिमंदिरातही पवनेचे पाणी शिरले. सखल भागांत, तसेच महामार्गावरही पाण्याची तळी साचली. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूककोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला. शहरात ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागले.

मध्यरात्रीपासून पावसाने सलग हजेरी लावली. सकाळी पावसाचा जोर वाढल्याने चाकरमानी, विद्यार्थ्यांसह शहरातील व्यावसायिकांची तारांबळ उडाली. संततधार पावसामुळे शहरातील जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले. पावसाचा जोर वाढल्याने शहरातील नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले. मावळात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शहरातून वाहणाऱ्या पवना व इंद्रायणी नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली. मोरया गोसावी समाधिमंदिरातही पवनेचे पाणी शिरले. थेरगाव येथील केजूबाई मंदिरात नदीपात्रातील पाणी शिरले. भोसरी, चिंचवड, पिंपरी, नाशिक फाटा, पिंपळे सौदागर, रावेत, वाकड, प्राधिकरण, निगडी या भागांमध्ये रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत होती.

परिसरातील प्रमुख, तसेच अंतर्गत रस्त्यांवर नागरिकांना आणि चाकरमान्यांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. रस्त्यावरील सिग्नल यंत्रणा कोलमडलेली पाहायला मिळाली. ठिकठिकाणी उखडलेल्या रस्त्यांमुळे वाहनचालकांची कसरत पाहायला मिळाली. सखल भागांत पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पावसाचे पाणी साचल्याने, काही ठिकाणी चेंबर ओव्हरफ्लो झाल्याने नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागले. सिग्नल यंत्रणा काही ठिकाणी कोलमडल्याने ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली. स्मार्ट सिटीच्या कामाअंतर्गत ठिकठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहे. त्यामुळे रस्ते चिखलमय झाले आहेत.

पवना धरण पाणीसाठा 37 टक्क्यांवर

पिंपरी चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मागील 24 तासात 87 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. धरणात सध्या एकूण 37 टक्के पाणीसाठा झाला आहे. वडीवळे धरणामध्ये 65 टक्के पाणीसाठा झाला आहे. कासारसाई धरणामध्ये 55.85 टक्के, तर, आंद्रा धरणात 44.85 टक्के पाणीसाठा झाला आहे. जोरदार पावसामुळे मावळातील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.

पुणे-मुंबई महामार्गाची गती संथ

मुसळधार पावसामुळे वडगाव मावळ येथे मुंबई -पुणे महामार्गपाण्याखाली गेला आहे. मावळ तालुक्याचे आराध्य दैवत असलेले पोटोबा महाराज मंदीर व समोरील रस्ता पूर्णपणे जलमय झाला आहे. देहूरोड येथील सेंट्रल चौकाजवळ मृगन टेम्पल तसेच घोरवडेश्वर डोंगर आहे. देहूरोड सेंट्रल चौकाजवळ घोराडेश्वर डोंगरावरून येणाऱ्या पावसाचे पाणी मुंबई- पुणे महामार्गावर साचल्याने गुरुवारी सकाळ पासूनच वाहतूक संथ झाली होती. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले.

महाबळेश्वरमध्ये मुसळधार; जनजीवन विस्कळीत, रस्ते खचल्यामुळे गावांचा संपर्क तुटला

लोणावळ्यात धबधबे ओसंडले; 221 मिलिमीटर पाऊस

लोणावळा, खंडाळा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, गुरुवारी 221 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या पाच दिवसांत लोणावळ्यात तब्बल 734 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. भुशी धरण भरले असून, धरणाच्या पायऱ्यांवरून अतिशय वेगाने पाणी वाहत असल्याने त्या भागात पर्यटकांनी जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. धबधबेही ओसंडून वाहू लागले आहेत. शहरासह कुरवंडे, कुसगाव, डोंगरगाव, औंढे, औंढोली, कार्ला, वेहेरगाव परिसरात रात्रभर जोरदार पाऊस सुरू आहे. ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. सखल भागांत पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढल्याने परिसर जलमय झाला होता.

“नदीकाठच्या लोकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने नदीपूल, नदीघाट, नदी परिसरात गर्दी करू नये. पुलावर पाणी असल्यास पूल ओलांडू नये. आपत्कालीन परिस्थितीसाठी पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी कोणत्याही मदतीसाठी ‘डायल 112’ला संपर्क करावा.”

विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मिर्ची खाल्ली किंवा तिखट लागल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळा, महागात पडेल चूक; 90 टक्के लोकांना माहित नसेल कारण मिर्ची खाल्ली किंवा तिखट लागल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळा, महागात पडेल चूक; 90 टक्के लोकांना माहित नसेल कारण
अनेकांना मसालेदार पदार्थ खायला आवडतात. पण अचानक अनेकदा दाताखाली पटकन मिर्ची येते जीभ झोंबू लागते. तोंडाची जळजळ होते. डोळ्यांतून पाणी...
तुम्ही पण अशीच चपाती भाजता का?वाढेल कॅन्सरचा धोका; लगेच बदला ही सवय
Weight Loss Recipe – लहानांसह मोठ्यांना आवडेल असा सकस नाचणीचा उपमा, वजन कमी करण्यासाठी सर्वात उपयुक्त
IND Vs ENG 1st Test – दोन्ही संघांचे खेळाडू काळीपट्टी बांधून मैदानात उतरले, कारण काय?
Pune News – नदीपात्रात उतरून सेल्फी काढणाऱ्या तरुणांना घडवली अद्दल, उठाबशा काढायला लावत पोलिसांनी शिकवला धडा
लग्नसमारंभाहून घरी परतत असताना वऱ्हाडावर काळाचा घाला, ट्रकच्या धडकेत कारमधील 9 जण ठार
Photo : गळ्यात रुद्राक्षाची माळ, सफेद साडी नेसून केदारनाथला पोहोचली अमृता, शेअर केले सुंदर फोटो