Kitchen Cleaning Tips- तुमच्याही किचन सिंकच्या पाईपमधून झुरळं येतात, मग वापरा हा होममेड स्प्रे
आपलं किचन स्वच्छ असावं हे प्रत्येकाला वाटत असतं. परंतु स्वयंपाक घर कितीही स्वच्छ ठेवलं तरी, झुरळांचा त्रास काही कमी होत नाही. स्वयंपाकघरातील झुरळं ही अनेकांसाठी डोकेदुखी बनले आहेत. म्हणूनच स्वयंपाकघरातील झुरळांवर अगदी स्वस्त असा परवडणारा स्प्रे आपण घरीच तयार करु शकतो. आपल्या स्वयंपाक घरातील सिंकमध्ये अनेकदा खरकटं अडकतं. त्यामुळे झुरळांचा त्रास फार मोठ्या प्रमाणात होतो.
स्वयंपाकघरातील स्वच्छतेमध्ये सिंकची स्वच्छताही तितकीच महत्त्वाची मानली जाते. सिंकमधून येणारी झुरळं ही आपल्या आरोग्यासाठीही तितकीच धोकादायक असू शकतात. म्हणूनच स्वयंपाकघरातील सिंक स्वच्छ ठेवण्यासाठी, तसेच यावर कायमस्वरुपी उपाय करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी करणे गरजेचे आहे.
स्वयंपाकघरातील सिंकमधून येणाऱ्या झुरळांपासून सुटका कशी मिळवाल?
आपल्या मनाला तजेला देणारा कॉफीचा सुगंध झुरळांचा शत्रू आहे. ग्राउंड कॉफीचा सुगंध आणि त्यातील कॅफिन झुरळांसाठी स्लो पॉयझन म्हणून काम करतात. कॉफी बारीक बारीक करून कापडात गुंडाळून लहान बंडल बनवा. हे बंडल स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात लपवा. झुरळांना काॅफीचा वास अजिबात सहन होत नाही.
कडुलिंबाचा मजबूत सुगंध आणि इतर कीटकांपासून बचाव करणारे गुणधर्म झुरळांसाठी कर्दनकाळ आहे. कडुलिंबाच्या तेलात कापूस बुडवून झुरळ दिसतील अशा ठिकाणी ठेवा. काही दिवसात तुम्हाला त्याचा परिणाम दिसू लागेल. याशिवाय तुम्ही स्वतःचा घरगुती झुरळ मारण्याचा स्प्रे कडुनिंबाच्या पावडरने तयार करू शकता. यासाठी गरम पाण्यात एक चमचा निंबोळी पावडर मिसळा. झुरळ लपण्याच्या ठिकाणी रात्री फवारणी करा.
ग्राउंड कॉफीप्रमाणे, बोरॅक्स पावडर देखील झुरळांसाठी मंद विष म्हणून काम करते. बोरॅक्स पावडर आणि साखर मिसळल्यावर झुरळे साखरेच्या गोडव्याने आकर्षित होतात आणि ते सेवन करतात. बोरॉक्स पावडरमुळे त्यांच्या शरीरात निर्जलीकरण होते. निर्जलीकरणामुळे ते काही दिवसात सुकतात आणि मरतात. याकरता तीन भाग बोरॅक्स पावडर एक भाग साखर मिसळून स्वयंपाकघरातील ज्या भागात झुरळ जास्त आहेत तिथे ठेवावे. रात्रभर तिथे ठेवल्यानंतर सकाळी झाडूने काढून टाका.
हे साधे सोपे उपाय सिंकमधून येणाऱ्या झुरळांवर रामबाण उपाय आहेत. किचनसिंकच्या पाईमच्या अवतीभवती आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा हे उपाय करायला हवेत. हे उपाय प्रभावी तर आहेतच, पण ते किमान वरचेवर करणेही तितकेच गरजेचे आहे. आत्तापर्यंत तुम्ही महागड्या क्लिनर्सवर खर्च करत होता, त्यापेक्षा हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय बेस्ट
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List