ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामध्ये ठाण्यातल्या अब्दुल्लाचे काय काम? संजय राऊत यांनी मिंध्यांना फटकारले

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामध्ये ठाण्यातल्या अब्दुल्लाचे काय काम? संजय राऊत यांनी मिंध्यांना फटकारले

लोकसभा निवडणुकीत मेलेले विधआनसभेला ईव्हीएमच्या ऑक्सिजनवर जिंवत झाले. आता आमागी काळात जनता कोणाला मारणार आणि कोणाला जिंवत ठेवणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. तसेच मिंधे यांनी वापरलेल्या शब्दांची आम्ही नोंद केली आहे, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार, असा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी ठणकावले. तसेच यावेळी त्यांनी मिंधे आणि भाजपची सालटी काढली.

लाचार आणि आश्रितांचे जीणं जगत असलेल्या आणि दिल्लीत जाऊन अमित शहा आणि कंपूचे बूट चाटणाऱ्या लोकांना स्वाभिमान नाही. अशा प्रकारे जगण्यापेक्षा स्वाभिमानी व्यक्ती मृत्यू पत्करेल. ते अशा प्रकारे जगत आहेत म्हणजे ते मेलेलेच आहेत. ते आता भाजपत जात नवी संस्कृती रुजवत आहेत. त्या संस्कृतीला शोभणारी त्यांची भाषा आहे. कोण जिंवत आहे आणि कोण मेले आहे, हे येणारा काळच ठरवणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीत ते मेले होते, विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमच्या ऑक्सिजनवर ते जिंवत झाले. राज्यातील जनता येणाऱ्या काळात कोणाला मारणार आणि कोणाला जिंवत ठेवणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख यांच्याबाबत त्यांनी जे शब्द वापरले आहेत, त्याची नोंद आम्ही घेतली आहे, त्याचे त्याच पद्धतीने उत्तर दिले जाणार आहे, असेही त्यांनी ठणकावले.

ठाकरे बंधू एकत्र येणार का, याबाबतच्या चर्चा होत आहेत. हा दोन्ही भावांचा विषय आहे. त्यात हा ठाण्याचा अब्दुल्ला का नाचतोय? भाजपसोबत जाण्यासाठी ते उतावीळ झाले होते. आता दोन भाऊ एकत्र येत असल्याने त्यांचा तिळपापड का होत आहे. त्यांची अघोरी विद्या चालत नाही काय? एकत्र येण्याबाबत दोन भाऊ आणि महाराष्ट्राची जनता निर्णय घेईल. दोन समान विचारांचे पक्ष महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी एकत्र येत असतील, तर यांचा तिळपापड का होतो. गुवाहाटीत पुरलेली शिंगे आणि कापलेले रेडे त्यांना यश प्राप्त करून देत नाहीत. आमचे निर्णय आम्ही घेऊ. तुम्ही स्वतःचा विचार करा. फडणवीसांनी तुमची काय अवस्था केली आहे. त्यांचे पायपुसणे करून टाकले आहे. त्यांचे पोतेरे झाले आहे आणि लवकरच मातेरीही होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत आम्ही क्षेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक आहोत. मराठी माणसाची एकजूटीमुळे देशात नवी उर्जा निर्माण होणार आहे. महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले, हे लक्षात ठेवायला हवे. आम्ही महाराष्ट्रासाठी नेहमीच झटत आहोत. महाराष्ट्रद्रोही शक्तींविरोधात आम्ही ठामपणे उभे आहोत. ठाकरे ब्रँड हा देशातील सुप्रीम ब्रँड आहे. मिंधे, फडणवीस, अमित शहा कोणालाही या ब्रँडला डॅमेज करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजपने त्यांच्या राजकारणासाठी याआधी राज ठाकरे यांची मदत घेतली आहे. ती त्यांची ताकद नव्हती म्हणून मदत घेतली का? आता दोन भाऊ, मराठी जनता एकत्र येत असल्याने भाजप आणि मिंध्यांचा जळफळाट, तिळपापड होत आहे. त्यामुळे डोममधला डोमकावळा फडफडत होता. दोन भाऊ एकत्र येण्याची धास्ती त्यांनी घेतल्याने अशी विधाने ते करत आहे. एकत्र येण्याचा निर्णय हा राजकीय आहे. तसेच हा मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे ठाकरे बंधू यावर सांमजस्याने योग्य ती भूमिका घेतील, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;