ट्रम्प पुन्हा तोंडघशी पडले; कोर्टाकडून आणखी एका तुघलकी निर्णयाला स्थगिती, हिंदुस्थानच्या शेकडो विद्यार्थ्यांना दिलासा

ट्रम्प पुन्हा तोंडघशी पडले; कोर्टाकडून आणखी एका तुघलकी निर्णयाला स्थगिती, हिंदुस्थानच्या शेकडो विद्यार्थ्यांना दिलासा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा तोंडघशी पडले आहेत. ट्रम्प यांचा आणखी एक निर्णय अमेरिकन न्यायालयाने फिरवला आहे. ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची पात्रता रद्द केली होती. बुधवारी त्यांनी या निर्णयावर स्वाक्षरी केली होती. मात्र ट्रम्प यांच्या या तुघलकी निर्णयाला अमेरिकन न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यामुळे हिंदुस्थानच्या 788 विद्यार्थ्यांसह जगभरातील 7 हजार विदेशी विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. याआधी आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाने टेरिफ बेकायदेशीर असल्याचे म्हणत ट्रम्प यांना मोठा धक्का दिला होता.

हार्वर्ड विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येऊ नये यासाठी ट्रम्प यांनी मोठे पाऊल उचलले होते. ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची पात्रता रद्द केली होती. तसेच हार्वर्डच्या केब्रिज, मॅसेच्यूसेट्स येथील विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास ते राष्ट्रीय सुरक्षेस घातक ठरेल असे म्हणत ट्रम्प यांनी बुधवारी आदेशावर स्वाक्षरी केली होती. याला हार्वर्ड विद्यापीठाने विरोध करत न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने ट्रम्प यांचा हा निर्णय तात्पुरता स्थगित केला आहे.

टॅरिफ बेकायदेशीर! अमेरिकन न्यायालयाचा ट्रम्प यांना मोठा धक्का, हिंदुस्थान-पाकिस्तान संघर्षाचा युक्तीवादही फेटाळला

ट्रम्प यांचा हा निर्णय अमेरिकेच्या पहिल्या घटना दुरुस्तीने शैक्षणित संस्थांना दिलेल्या मुलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचा युक्तिवाद हार्वर्ड विद्यापीठाने केला. तसेच प्रशासनाने सूडबुद्धीने उचललेले हे पाऊल असून विदेशी विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी सर्व कायदेशीर मार्ग वापरले जातील असेही विद्यापीठाने स्पष्ट केले होते.

डोनाल्ड ट्रम्प एकाकी पडले; जगभरात अमेरिकेचा दबदबा निर्माण करण्याच्या स्वप्नाचे हसे झाले

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;