Amazon Layoff – काम करायला तयार व्हा नाहीतर राजीनामा द्या.. अमेझॉनने उडवली कर्मचाऱ्यांची झोप

Amazon Layoff – काम करायला तयार व्हा नाहीतर राजीनामा द्या.. अमेझॉनने उडवली कर्मचाऱ्यांची झोप

अमेझॉन कंपनीने एक नवा फतवा काढून कर्मचाऱ्यांची झोप उडवली आहे. अमेरिकेतील अमेझॉन कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना आदेश दिला आहे की, त्यांना कंपनीच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या इतर कार्यालयांमध्ये जाऊन काम करावे लागणार आहे. हा आदेश ज्यांना मान्य नसेल त्यांनी राजीनामा देण्यास हरकत नाही असे स्पष्टपणे म्हटले आहे.

अमेझॉनने आपल्या कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी कार्यालयामध्ये शिफ्ट होण्यास सांगितले आहे. ज्यांना हा निर्णय मान्य नाही त्यांना राजीनामा देण्यासाठी आता 30 दिवसांची मुदत दिली आहे. कंपनीने काढलेल्या या आदेशामुळे आता कर्मचाऱ्यांची रात्रीची झोप उडाली आहे.

अमेझॉनने आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना अर्लिंग्टन, व्हर्जिनिया आणि वॉशिंग्टन सारख्या शहरांमध्ये शिफ्ट होण्यास सांगितले आहे. हा आदेश वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. आता कर्मचाऱ्यांनी शिफ्ट व्हायचे की नाही, हे ठरवण्यासाठी फक्त 30 दिवस मिळणार आहेत. कर्मचारी शिफ्ट होण्यास तयार असतील तर ठीक, अन्यथा त्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. यातील मुख्य बाब म्हणजे, राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणताही सेव्हरन्स पेमेंट म्हणजेच भरपाई देखील मिळणार नाही.

मे महिन्यातील नोकऱ्यांवरील कपातीनंतर, Microsoft पुन्हा एकदा कपातीची कात्री चालवणार!

याआधीच अनेक कंपन्यांमध्ये नोकरकपातीची टांगती कुऱ्हाड असताना, आता कर्मचाऱ्यांवरील दबाव आणखी वाढला आहे. कोरोनाच्या काळात अमेझॉनने आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सुविधा दिली होती. त्यानंतर कंपनीने 2 जानेवारी 2025 पासून ‘रिटर्न टू ऑफिस’ हे धोरण अवलंबिले. त्यानंतर कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येऊन आठवड्यातून पाच दिवस काम करण्यास सांगितले होते.

अलिकडेच मायक्रोसॉफ्टपासून ते मेटा, वॉलमार्ट, आयबीएमपर्यंत अनेक अमेरिकन कंपन्यांमध्ये, कपातीचे मळभ अधिकच गडद झाले आहे. दरम्यान, अमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की, पुढील काही वर्षांत कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) मुळे कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणार आहे. अमेझॉन आता त्यांच्या कामकाजात अधिक एआय टूल्स आणि एजंट्सचा समावेश करत आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांवर नोकऱ्या वाचवण्याचा दबाव पूर्वीपेक्षा अधिक पटीने वाढला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;