ठाणे महापालिकेच्या तत्कालीन सह आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या फेरीवाल्याला 7 वर्षांची शिक्षा

ठाणे महापालिकेच्या तत्कालीन सह आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या फेरीवाल्याला 7 वर्षांची शिक्षा

ठाणे महापालिकेच्या तत्कालीन सह आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अतिक्रमण हटवत असताना कोविड काळामध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी अमरजीत सिंह यादव या फेरीवाऱ्याला शुक्रवारी 307 च्या गुन्ह्यात दोषी ठरवत 7 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याबद्दल व सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याबद्दल अमरजीत याला न्यायालयाने त्याला 3 वर्षाची व दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्याप्रमाणे कलम 237 नुसार 2 वर्षाची शिक्षा व दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच मुंबई कायदा कलम 37/1/3 नुसार आरोपीला दोषी धरत 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. ही सगळी शिक्षा सक्त मजुरीची आहे.

या खटल्यात सरकारी वकील म्हणून अॅड. शिशिर हिरे यांनी काम पाहिले. तसेच सुनावणीवेळी खटल्यात एकूण 21 साक्षीदार तपासण्यात आले होते. तपासाअंती अमरजीत सिंग यादव याने केलेला हल्ला हा जीवघेणा होता हे सरकारी वकिल शिशिर हिरे यांनी न्यायालयात सिद्ध केले.

काय आहे प्रकरण?

घोडबंदर रोड येथील कासारवडवली परिसरात कल्पिता पिंपळे आणि त्यांचे अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर अमरजितसिंह यादव या माथेफिरू फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला होता. यामध्ये पिंपळे यांची दोन व पालवे यांचे एक बोट तुटले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;