चोर सोडून संन्याशाला…. DSP च्या पत्नीने सरकारी कारच्या बोनेटवर बसून केक कापला; अटक केली ड्रायव्हरला
छत्तीसगडमध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये छत्तीसगडमधील जिल्हा बलरामपूरमध्ये तैनात डीएसपी तस्लीम आरिफ यांच्या पत्नीने सरकारी वाहनाच्या बोनेटवर बसून वाढदिवसाचा केक कापला. हा व्हिडिओ अंबिकापूर शहरापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या रिसॉर्ट सरगवा पॅलेस कॉम्प्लेक्सचा असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत डीएसपीच्या ड्रायव्हरविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
सोशल मीडियावरप हा व्हि़डीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये डीएसपी तस्लीम आरिफ यांच्या पत्नीने सरकारी गाडीचा दुरूपयोग केल्याचे दिसून आले. निळा दिव्याच्या सरकारी कारच्या बोनेटवर बसून महिला वाढदिवसाचा केप कापताना दिसत आहे. तसेच त्यांच्या इतर मैत्रिणीही कारच्या सनरूफमधून अधवा कारच्या विंडोमधून हातवारे करताना दिसत आहेत. सरकारी कारचा अशापद्धतीने दुरुपयोग केल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा पद्धतीचे व्हिडीओ बनवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
दरम्यान, हा व्हि़डीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने भाजप सरकारवर टीका केली. जो कायदा इतरांसाठी लागू होतो तोच यांना पण लागू केला जाईल का असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला. सरकारी मालमत्तेचा स्पष्ट गैरवापर आणि वाहतूक आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन असूनही, पोलिसांनी एफआयआरमध्ये डीएसपी आरिफ किंवा त्यांच्या पत्नीचे नाव घेतले नाही. त्याऐवजी, त्यांनी मोटार वाहन कायद्याच्या कलम 177, 184 आणि 281 अंतर्गत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List