शुभांशू शुक्लाचा अंतराळ प्रवास पुन्हा लांबणीवर, ऑक्सिओम-4 मिशन पाचव्यांदा रखडले

शुभांशू शुक्लाचा अंतराळ प्रवास पुन्हा लांबणीवर, ऑक्सिओम-4 मिशन पाचव्यांदा रखडले

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी प्रक्षेपित होणारे ऑक्सिओम-4 मिशन पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. हे मिशन सलग पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आले आहे. 22 जून 2025 ला फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात येणार होते, परंतु दोन दिवसआधीच तारीख पुढे ढकलण्यात आले आहे. 8 जून, 10 जून, 11 जून, 19 जून आणि 22 जून 2025 सलग पाच वेळा हे मिशन पुढे ढकलण्यात आले आहे.

हिंदुस्थानचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळवर जाणार आहेत, परंतु शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ प्रवासाला मुहूर्त मिळेना झाला असून त्यांचा अंतराळातील प्रवास आणखी लांबणीवर पडला आहे. शुभांशू हे आयएसएसमध्ये जाणारे पहिले भारतीय आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय असतील. याआधी राकेश शर्मा यांनी 1984 मध्ये सोव्हिएत युनियनच्या अंतराळयानातून अंतराळ प्रवास केला होता.

मुहूर्त मिळेना

सर्वात आधी 29 मे रोजी ड्रग अंतराळवीरांना घेऊन जाणार होते, परंतु ड्रगन अंतराळयानाची तयारी नसल्याने प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर 8 जून रोजी तारीख देण्यात आली, परंतु खराब हवामान असल्याने ऑक्सिओम-4 मिशन पुन्हा एकदा लांबणीवर पडले. नंतर 10 जून तारीख देण्यात आली, परंतु 10 जूनलाही खराब हवामान आहे, असे सांगत हे मिशन तिसऱ्यांदा पुढे ढकलण्याची वेळ आली. 11 जूनला हवामान व्यवस्थित होते, परंतु तपासणीवेळी ऑक्सिजन गळती आढळल्याने हे मिशन पुढे ढकलण्याची वेळ आली. 19 जून आणि 22 जून अशी सलग दोन वेळची तारीख पुढे ढकलली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य? केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य?
केळं हे एक असं फळ आहे जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. मऊसर, गोडसर आणि ऊर्जा देणारं हे फळ नाश्त्यासाठी आदर्श...
महायुतीच्या काळात कर्जात वाढ, जनतेच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी सरकारने काढला पळ; अंबादास दानवेंची टीका
Chhattisgarh News – नारायणपूरमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार
Mumbai News – बँकॉकहून मुंबईत गांजा तस्करी प्रकरणी मुंबई विमानतळावर प्रवाशाला अटक, सीमाशुल्क विभागाची कारवाई
Photo – सई… बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल
महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, दुकानं नाही शाळाही बंद करेन; राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणावी, युवा पिढीचं भविष्य अंधारात घालायचे पाप करू नका – कैलास पाटील