Iran Earthquake- इस्रायलचा हल्ला की इराणची अणुचाचणी? भूकंप नेमका कशामुळे झाला, तर्कवितर्क सुरू

Iran Earthquake- इस्रायलचा हल्ला की इराणची अणुचाचणी? भूकंप नेमका कशामुळे झाला, तर्कवितर्क सुरू

आखातातील इराण इस्त्रायलमधील युद्धाची तीव्रता आता वाढत आहे. इराणने  आक्रमक पवित्रा घेत आता कोणतीही चर्चा होणार नाही, असे स्पष्ट केल्यानंतर इस्रायलने इराणवर हवाई हल्ल्यांचा वर्षाव केला आहे. त्यामुळे दोन्ही देशातील तणाव शिगेला पाहचला आहे. त्यातच इराणमध्ये शुक्रवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवल्याने स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. तसेच या भूंकपाबाबत अनेक तर्कवितर्क करण्यात येत आहेत.

इराणमध्ये शुक्रवारी रात्री 8:49 मिनीटांनी भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 5.2 इतकी नोंदवण्यात आली. सेमनान शहराच्या आग्नेय दिशेने 78 किलोमीटर अंतरावर हा भूकंप नोंदवण्यात आला. युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटर (EMSC), जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेस (GFZ) आणि सिटिझन सिस्मोग्राफ नेटवर्क रास्पबेरीशेक यांनीही भूकंपाची पुष्टी केली आहे.

इराणी अधिकाऱ्यांनीही या भूकंपाची पुष्टी केली आहे. सेमनान आणि महदीशहर सारख्या भागात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र यामध्ये कोणच्याही प्रकारची हानी झालेली नाही. दरम्यान भूकंपाची तीव्रता जास्त नसली तरी स्थानिकांना सतर्क राहण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

इस्रायलने इराणच्या अणुकेंद्रावर सातत्याने हल्ले चढवले आहेत. तसेच इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे महत्त्वाचे अणुशास्त्रज्ञ
ठार झाले आहेत. त्यामुळे इराणला मोठा धक्का बसला आहे. त्यातच इस्रायलने इराणच्या अणुकेद्रांवर केलेल्या हल्ल्यामुळे मोठा स्फोट झाला असवा आणि त्यामुळे हे भूकंपाचे धक्के जाणवल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इराण अण्वस्त्र कार्यक्रम राबवत असून त्या परीक्षणावेळी स्फोट होऊन भूकंपाचे हादरे बसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अणुचाचणीनंतर जवळच्या भागात भूकंप जाणवतात. त्यामुळे आता या युध्दाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलच्या हल्लांमुळे स्फोट होऊन हे हादरे बसले की इराणच्या अणु परीक्षण कार्यक्रमामुळे हादरे बसले किंवा खरोखरच नैसर्गिकपणे हा भूकंप झाला याबाबत तर्कवितर्क वर्तवण्यात येत आहे.

बिनशर्त माघार घ्यायला लावू! इराणचा इस्रायलला इशारा

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लॉस एंजेलिस पोलिस प्रशिक्षण केंद्रात मोठा स्फोट, तीन उप शेरीफ जागीच ठार लॉस एंजेलिस पोलिस प्रशिक्षण केंद्रात मोठा स्फोट, तीन उप शेरीफ जागीच ठार
अमेरिकेतील लॉस एंजेलिस काउंटी शेरीफ विभागाच्या बिस्केलुझ प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी मोठा स्फोट झाला. यात स्फोटात तीन उप शेरीफ अधिकाऱ्यांचा मृत्यू...
केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य?
महायुतीच्या काळात कर्जात वाढ, जनतेच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी सरकारने काढला पळ; अंबादास दानवेंची टीका
Chhattisgarh News – नारायणपूरमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार
Mumbai News – बँकॉकहून मुंबईत गांजा तस्करी प्रकरणी मुंबई विमानतळावर प्रवाशाला अटक, सीमाशुल्क विभागाची कारवाई
Photo – सई… बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल
महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, दुकानं नाही शाळाही बंद करेन; राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान