चंद्रपूर जिल्ह्यात 49 हजार हेक्टरवरच पेरणी, पावसाचा पत्ता नाही; कापूस सोयाबीन लागवडीचे वेळापत्रकच बिघडले

चंद्रपूर जिल्ह्यात 49 हजार हेक्टरवरच पेरणी, पावसाचा पत्ता नाही; कापूस सोयाबीन लागवडीचे वेळापत्रकच बिघडले

खरीप हंगामातील मशागत पूर्ण करून चातकाप्रमाणे वाट पाहूनही पुरेसा पाऊस न आल्याने आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात फक्त 49 हजार 520 हेक्टर क्षेत्रातच पेरणी होऊ शकली. यंदा चार लाख 75 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन असताना पावसाने दडी मारली. त्यामुळे चिंतातुर शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

सिंदेवाही तालुक्यात सर्वाधिक 67.3, सावली तालुक्यात सर्वात कमी 12.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 4 लाख 58 हजार 729 हेक्टर खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र आहे. त्यापैकी 4 लाख 75 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले. आतापर्यंत 39.8 मिमी पाऊस पडला. त्यामुळे आतापर्यंत 49.520 हजार हेक्टर क्षेत्रातच पेरणी झाली आहे.

खरीप हंगामात धान, कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. धानाच्या शेतीसाठी मुबलक पाण्याची आवश्यकता आहे. बऱ्याच धान उत्पादक शेतकऱ्यांनी अद्याप पहे टाकले नाही. पुरेसा पाऊस आला नाही तर अंकुर करपून जाईल, याची भीती आहे. त्यामुळे मशागत पूर्ण करून पावसाची वाट पाहत आहेत. मात्र, कापूस व सोयाबीन लागवडीचे वेळापत्रक पावसाने बिघडविले. अनेक शेतकरी अजूनही लागवडीचा खर्च जुळविण्यासाठी धावाधाव करीत आहेत. पीक कर्ज देण्यास यंदा जिल्हा मध्यवर्ती बँकेची कामगिरी अव्वल राहिली. परंतु, राष्ट्रीयीकृत बँका नेहमीप्रमाणे दिरंगाई करीत आहेत. त्यातच पावसाने दडी मारल्याने यंदाच्या शेतीचे काय होणार, याबाबत चिंता व्यक्त करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लॉस एंजेलिस पोलिस प्रशिक्षण केंद्रात मोठा स्फोट, तीन उप शेरीफ जागीच ठार लॉस एंजेलिस पोलिस प्रशिक्षण केंद्रात मोठा स्फोट, तीन उप शेरीफ जागीच ठार
अमेरिकेतील लॉस एंजेलिस काउंटी शेरीफ विभागाच्या बिस्केलुझ प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी मोठा स्फोट झाला. यात स्फोटात तीन उप शेरीफ अधिकाऱ्यांचा मृत्यू...
केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य?
महायुतीच्या काळात कर्जात वाढ, जनतेच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी सरकारने काढला पळ; अंबादास दानवेंची टीका
Chhattisgarh News – नारायणपूरमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार
Mumbai News – बँकॉकहून मुंबईत गांजा तस्करी प्रकरणी मुंबई विमानतळावर प्रवाशाला अटक, सीमाशुल्क विभागाची कारवाई
Photo – सई… बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल
महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, दुकानं नाही शाळाही बंद करेन; राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान