इंटेल कंपनी दहा हजार कर्मचाऱ्यांना काढणार, आधीच नोकऱ्यांची बोंबाबोंब, त्यात कर्मचारी कपात

इंटेल कंपनी दहा हजार कर्मचाऱ्यांना काढणार, आधीच नोकऱ्यांची बोंबाबोंब, त्यात कर्मचारी कपात

जगप्रसिद्ध चिप निर्माता कंपनी इंटेल आतापर्यंतची सर्वात मोठी कर्मचारी कपात करणार आहे. इंटेल कंपनी जुलै 2025 मध्ये आपल्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधील 15 ते 20 टक्के कर्मचाऱ्यांना म्हणजेच जवळपास 10 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे 10 हजारांहून अधिक जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. ही कर्मचारी आतापर्यंची कंपनीतील सर्वात मोठी कपात आहे.

कंपनीच्या फाऊंड्री विभागात 15 फॅब प्लांटचा समावेश आहे. या विभागातील कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा फटका बसणार असून शेकडो लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. फॅक्टरीतील टेक्निशियनपासून चिप डिझाइनपर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत. इंटेल कंपनी या वेळी कर्मचाऱ्यांना व्हीआरएस म्हणजे ऐच्छिक निवृत्ती योजनेचा पर्यायसुद्धा देणार नाही. ज्या कर्मचाऱ्यांचा परफॉर्म्स चांगला नाही, अशा कामगारांना थेट घरी जाण्यास सांगितले जाणार आहे.

कंपनीला 821 मिलियन डॉलर्सचा तोटा

2025 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीला 821 मिलियन डॉलर्सचा तोटा सहन करावा लागला आहे. 7.9 अब्ज डॉलर्सची अमेरिकन सरकारकडून मिळणारी सबसिडीसुद्धा अद्याप मिळणे बाकी आहे. एनवीडियासारख्या कंपनीची जबर स्पर्धा आहे. त्यामुळे कंपनी लागोपाठ कर्मचारी कपात करत आहे. कंपनीतील ही तिसरी कर्मचारी कपात आहे. याआधी ऑगस्ट 2024 मध्ये 15 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते. जानेवारी 2025 मध्ये 20 टक्के कर्मचारी कपातीची घोषणा करण्यात आली. जुलै 2025 पर्यंत 10 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

मायक्रोसॉफ्टमध्येही कपातीची टांगती तलवार

मायक्रोसॉफ्ट कंपनी पुन्हा एकदा कर्मचारी कपात करणार आहे. या वेळी सेल्स विभागातील कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास सांगितले जाणार आहे. मायक्रोसॉफ्टने मे महिन्यात 6 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली होती. त्यानंतर जून महिन्यातसुद्धा 300 हून अधिक कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होता. आता कंपनी पुन्हा जुलैमध्ये कर्मचारी कपात करणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लॉस एंजेलिस पोलिस प्रशिक्षण केंद्रात मोठा स्फोट, तीन उप शेरीफ जागीच ठार लॉस एंजेलिस पोलिस प्रशिक्षण केंद्रात मोठा स्फोट, तीन उप शेरीफ जागीच ठार
अमेरिकेतील लॉस एंजेलिस काउंटी शेरीफ विभागाच्या बिस्केलुझ प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी मोठा स्फोट झाला. यात स्फोटात तीन उप शेरीफ अधिकाऱ्यांचा मृत्यू...
केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य?
महायुतीच्या काळात कर्जात वाढ, जनतेच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी सरकारने काढला पळ; अंबादास दानवेंची टीका
Chhattisgarh News – नारायणपूरमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार
Mumbai News – बँकॉकहून मुंबईत गांजा तस्करी प्रकरणी मुंबई विमानतळावर प्रवाशाला अटक, सीमाशुल्क विभागाची कारवाई
Photo – सई… बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल
महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, दुकानं नाही शाळाही बंद करेन; राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान